ई-लुना ई-कॉमर्स डिलिव्‍हरींसाठी पसंतीची वेईकल म्‍हणून त्‍वरित यशस्‍वी ठरली

ई-लुना ई-कॉमर्स डिलिव्‍हरींसाठी पसंतीची वेईकल म्‍हणून त्‍वरित यशस्‍वी ठरली
● कायनेटिक ग्रीनने पुण्‍यातील लास्‍ट माइल डिलिव्‍हरींसाठी, तसेच बिग बास्‍केटची डिलिव्‍हरी पार्टनर सेफ अँड सेक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍ससाठी १३० ई-लुनाची डिलिव्‍हरी केली
● २०२४-२५ मध्‍ये ई-कॉमर्स डिलिव्‍हरींसाठी ५०,००० ई-लुनाच्‍या मोठ्या व्‍यवसायाची अपेक्षा
● कंपनीने झपाट्याने उदयास येत असलेल्‍या गिग अर्थव्‍यवस्थेसाठी परिपूर्ण सोल्‍यशून म्‍हणून ई-लुना सादर करण्‍यासाठी स्‍पेशल कॉर्पोरेट प्रोग्राम 'ई-लुना फ्लीट्स' लाँच केला आहे
पुणे, २७ मार्च २०२४: कायनेटिक ग्रीन या भारतातील आघाडीच्‍या इलेक्ट्रिक वेईकल उत्‍पादक कंपनीने भारतातील आघाडीचे ऑनलाइन ग्रोसरी स्‍टोअर बिग बास्‍केटची अधिकृत डिलिव्‍हरी पार्टनर सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍सला त्‍यांच्‍या बहुप्रतिक्षित ई-लुना इलेक्ट्रिक स्‍कूटर्सचा प्रबळ १३० युनिट्स ताफ्याच्‍या डिलिव्‍हरीसह मोठा टप्‍पा गाठला आहे. या उल्‍लेखनीय सहयोगामधून इलेक्ट्रिक गतीशीलतेचा वाढता अवलंब, तसेच वाढत्‍या गिग अर्थव्‍यवस्‍थेसाठी वैयक्तिक मोबिलिटी वेईकल व पसंतीची वेईकल म्‍हणून विविध ग्राहक विभागांमध्‍ये ई-लुनाचे मोठे यश देखील दिसून येते.  
चिंचवड, पुणे येथे भव्‍य इव्‍हेण्‍टचे आयोजन करण्‍यात आले, ज्‍याचे नेतृत्‍व कायनेटिक ग्रीनची आघाडीची चॅनेल पार्टनर जय माता दी ग्रीनने केले. तसेच या इव्‍हेण्‍टप्रसंगी कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी, सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍सचे संस्‍थापक - फैजल शेख, श्री.श्रीरंग बारणे - लोकसभा सदस्य, चिंचवड, पंकज शर्मा - अध्यक्ष दुचाकी, कायनेटिक ग्रीन, श्री मनीष मोहिते - डीलर प्रिन्सिपल, जय माता दी ग्रीन उपस्थित होते.  
ई-लुनाची प्रबळ डिझाइन आणि व्‍यावहारिक वैशिष्‍ट्ये सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍स सारख्‍या ई-कॉमर्स डिलिव्‍हरी व्‍यवसायांसाठी परिपूर्ण फिट ठरत आहेत. शक्तिशाली मेटल बॉडी आणि हेवी-ड्युटी चेसिससह निर्माण करण्‍यात आलेली ई-लुना मजबूती व टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमधील मोठे १६-इंच व्‍हील्‍स विविध प्रदेशांमध्‍ये आरामदायी राइडची, तसेच शहरातील रस्‍त्‍यांमधून सहजपणे नेव्हिगेट करता येण्‍याची खात्री देतात. ई-लुनामध्‍ये सर्वोत्तम पेलोड क्षमता आहे, ज्‍यामुळे ही किराणा माल व इतर आवश्‍यक सामान वाहून नेण्‍यासाठी अनुकूल वेईकल आहे.
प्रबळ रचनेव्‍यतिरिक्‍त ई-लुनाची खरी शक्‍ती अपवादात्‍मक कार्यक्षमतेमध्‍ये सामावलेली आहे. पारंपारिक पेट्रोल-पॉवर्ड स्‍कूटर्सच्‍या तुलनेत कमी कार्यसंचालन खर्च देणारी ई-लुना सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍स सारख्‍या व्‍यवसायांना कार्यसंचालन खर्च सानुकूल करण्‍यास आणि लाभक्षमता वाढवण्‍यास सक्षम करते. या इलेक्ट्रिक वेईकलचा प्रति किलोमीटर कार्यसंचालन खर्च फक्‍त १० रूपये आहे, जी या वेईकलची खासियत आहे. यामुळे परिवहन व डिलिव्‍हरी खर्च मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ई-कॉमर्स डिलिव्‍हरी इको-सिस्‍टममध्‍ये मोठ्या प्रमाणात बचत होते.
कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, ''आम्‍हाला आनंद होत आहे की, आमच्‍या ई-लुनाला वैयक्तिक गतीशीलतेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि गिग अर्थव्‍यवस्‍था व ई-कॉमर्स डिलिव्‍हरींसाठी अनुकूल व पसंतीची पार्टनर देखील आहे. सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍ससोबतच्‍या या सहयोगामधून ई-लुनाची वैविध्‍यता आणि विविध गरजांची पूर्तता करण्‍याची क्षमता दिसून येते. आम्‍हाला बिग बास्‍केटच्‍या शाश्‍वत डिलिव्‍हरी प्रवासाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे आणि बिग बास्‍केटच्‍या सहयोगीला या उल्‍लेखनीय डिलिव्‍हरीमधून ई-लुनाची शहरी डिलिव्‍हरींकरिता प्रबळ व इको-फ्रेण्‍डली सोल्‍यूशनसह व्‍यवसायांना सक्षम करण्‍याप्रती क्षमता दिसून येते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ई-लुना शहरी लॉजिस्टिक्‍ससाठी हरित भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल. आम्‍ही अशाच प्रकारच्‍या अनेक संधींवर काम करत आहोत आणि आम्‍हाला 2024-25 दरम्‍यान लास्‍ट माइल डिलिव्‍हरी विभागासाठी जवळपास 50,000 ई-लुनाच्‍या ऑर्डर बुकची अपेक्षा आहे.''
ई-लुनाने डिझाइन, कार्यक्षमता व पर्यावरणाप्रती जबाबदारीच्‍या परिपूर्ण संयोजनासह देशभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वेईकलच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेमधून ग्राहकांच्‍या व व्‍यवसायांच्‍या मानसिकतेमध्‍ये होत असलेला बदल दिसून येतो, ज्‍यामुळे अधिक शाश्‍वत शहरी इकोसिस्‍टमसाठी मार्ग सुखकर होत आहे. अपवादात्‍मक कार्यक्षमता आणि पर्यावरणाप्रती कटिबद्धतेसह ई-लुना व्‍यवसाय व व्‍यक्‍तींसाठी पसंतीची निवड बनण्‍यास स्थित आहे.
कायनेटिक ग्रीनचा कॉर्पोरेट प्रोग्राम 'ई-लुना फ्लीट्स'अंतर्गत आपल्‍या डिलिव्‍हरी सहयोगींना परिपूर्ण सोल्‍यूशन म्‍हणून ई-लुना प्रदान करण्‍याचा दृष्टीकोन आहे. यामध्‍ये त्‍यांच्‍या ई-लुनासाठी ३५० हून अधिक डिलरशिप्‍सच्‍या व्‍यापक नेटवर्कचा समावेश आहे, ज्‍यामधून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व स्‍पेअर्स सपोर्टची खात्री मिळेल. तसेच, कंपनीने परिपूर्ण आयटी प्‍लॅटफॉर्म केजी कनेक्‍ट सारख्‍या मूल्‍यवर्धित सेवांसाठी, तसेच रिअल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग व वेईकल परफॉर्मन्‍स डायग्‍नोस्टिक्‍स, ५ वर्षांच्‍या वारंटीसाठी एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी सोल्‍यूशन्‍स आणि फायनान्सिंग, फास्‍ट चार्जिंग व बॅटरी स्‍वॅपिंगसाठी भागीदारी अशा सेवांसाठी विविध सहयोग केले आहेत.
सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍सचे संस्‍थापक फझल शेख म्‍हणाले, ''सेफ अँड सीक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍समध्‍ये आम्‍ही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्‍यासाठी, तसेच पर्यावरणाप्रती जागरूक राहण्‍यासाठी कटिबद्ध आहोत. ई-लुना फ्लीट आमच्‍या कार्यसंचालनांसाठी गेम-चेंजर आहे. आम्‍ही पर्यावरणावरील फूटप्रिंट कमी करत आहोत, तसेच ई-लुनाचा कमी कार्यसंचालन खर्च, टिकाऊपणा व कार्यक्षमता आम्‍हाला उत्तमपणे डिलिव्‍हरी देण्‍यास व आमची लाभक्षमता वाढवण्‍यास साह्य करत आहे. ही पर्यावरण व आमच्‍या व्‍यवसायासाठी विन-विन स्थिती आहे.''
कायनेटिक ग्रीनच्‍या सेफ अँड सेक्‍युअर डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍ससोबतच्‍या सहयोगामधून इलेक्ट्रिक गतीशीलतेची परिवर्तनात्‍मक क्षमता दिसून येते. ई-लुना फ्लीट्स शहरातील डिलिव्‍हरींसाठी अधिक शाश्‍वत भविष्‍याचा मार्ग मोकळा करते, तसेच शहरी भागांमधील उत्‍सर्जन व ध्‍वनी प्रदूषण कमी करते. हा उल्‍लेखनीय सहयोग भारतासाठी शुद्ध, हरित भविष्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला