आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL) च्या पुण्यातील विद्यार्थ्यांचे JEE Main २०२४ मध्ये चमकदार यश;
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL) च्या पुण्यातील विद्यार्थ्यांचे JEE Main २०२४ मध्ये चमकदार यश;
तीन विद्यार्थ्यांची ९९ पर्सेंटाईल किंवा त्याहून चांगली कामगिरी;
अक्षत बन्झल अखिल भारत पातळीवर ३४१ क्रमांकावर
पुणे २५ एप्रिल २०२४ : प्रवेश परीक्षा क्षेत्रात अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड च्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा २०२४ च्या मुख्य परीक्षेतील भाग २ मध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे.
अक्षत बन्झल या AESL च्या विद्यार्थ्याने ९९.९८ पर्सेंटाईल गुण तसेच पदार्थविज्ञान विषयात १०० पर्सेंटाइल गुण मिळवून शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या पटलावर आपले नाव कोरले आहे. अक्षत अखिल भारतीय पातळीवर १४३ क्रमांकावर उत्तीर्ण झाला.
स्वरा टकले आणि हर्ष गुगळे या आकाश च्या विद्यार्थ्यांनीही ९९ पर्सेंटाईल पेक्षा सरस कामगिरी नोंदविली.
या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीतून त्यांचे अथक परिश्रम तसेच त्यांचे या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेतील विषयांबद्दलचे सखोल ज्ञान अधोरेखित होते. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने काल रात्री घोषित केलेल्या निकालात जाहीर झालेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामुळे उत्कृष्टतेचा नवा मापदंड नोंदला गेला आहे.
आकाश च्या प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या या अपवादात्मक गुणवत्तेच्या विद्यार्थ्यानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या संयुक्त प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. ही परीक्षा जगभरातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते.
या विद्यार्थ्यांचे यश ही त्यांची विविध विषयांमधील मूळ संकल्पना आत्मसात करण्याची निष्ठेने केलेली धडपड आणि शिस्तबद्ध अभ्यास याला मिळालेली ही पावती आहे. आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “आमच्या या यशाचे श्रेय आकाश ने अत्यंत काटेकोरपणे तयार केलेल्या अभ्यासक्रमाला आणि मार्गदर्शनाला जाते. त्यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन मिळाले नसते तर अतिशय कमी वेळात विविध विषयांत प्रावीण्य मिळवणे ही एक अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया होऊन बसली असती.”
AESL च्या शैक्षणिक आणि व्यवसाय विभागाचे प्रमुख श्री अमित सिंग राठोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. श्री राठोड म्हणाले, “ या विद्यार्थ्यानी मिळविलेले यश आकाश ने विद्यार्थ्यांना सर्वंकष मार्गदर्शन करण्यासाठी आणि कल्पक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून त्यांची स्पर्धात्मक परीक्षांमधील गुणवत्ता उंचावण्यासाठी केलेल्या अविश्रांत परिश्रमाचे यश आहे. त्यांच्या भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेछा.”
संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य परीक्षा ) – JEE (Main ) दोन सत्रात घेतली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी मिळते. JEE (Advanced) प्रगत परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) सारख्या प्रख्यात संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते तर JEE (Main) मुळे विविध राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होतात. JEE (Advanced) परीक्षा देण्यासाठी JEE (Main) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
आकाश तर्फे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चे अभ्यासक्रम शिकविले जातात. अलीकडे आकाश ने संगणकाधारित प्रशिक्षणावर अधिक भर द्यायला सुरुवात केली आहे. आकाश च्या आय ट्यूटर (iTutor) या प्रणालीत विद्यार्थ्यांना त्यांना सुसंगत असलेल्या गतीने शिकणे आणि जर काही सत्रे चुकली असतील तर ती पुन्हा अभ्यासणे शक्य झाले आहे. याशिवाय प्रत्यक्ष परीक्षेच्या धरतीवर घेतल्या जाणा-या चाचण्या विद्यार्थ्यांचा परीक्षेबद्दलचा आत्मविश्वास वाढवतात.
--
Comments
Post a Comment