कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेत काम करणारी मीरा देवस्थळे म्हणते, “विवाह म्हणजे एक सुंदर मिलन आणि मोठी जबाबदारी देखील आहे”
‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेत काम करणारी मीरा देवस्थळे म्हणते, “विवाह म्हणजे एक सुंदर मिलन आणि मोठी जबाबदारी देखील आहे”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ या नाट्यमय मालिकेत सध्या रतनशी परिवार एकत्र येऊन नंदिनी (मीरा देवस्थळे) चे आपल्या घरात स्वागत करण्याची तयारी करत आहे. पण या सोहळ्यात हेमराज (धर्मेश व्यास) मुळे व्यत्यय येतो कारण तो एक गुप्त इशारा देतो. दरम्यान, रूपा आणि हेतल यांना रौनक नैनीला गुपचुप घरी घेऊन येतो, ते आवडत नाही. त्यामुळे त्यांच्यात बोलाचाली होते. ही परिस्थिती लपवण्याचा ते प्रयत्न करतात पण नंदिनी आणि हेमराज यांना काहीतरी गडबड असल्याचा सुगावा लागतो. तणाव वाढत जातो, गुपित उघडकीस येते आणि रतनशी कुटुंबातील नात्यांचा गुंता नंदिनीपुढे उलगडू लागतो.
या कथानकाविषयी बोलताना मीरा देवस्थळे म्हणते, “मला वाटते विवाह एक सुंदर मिलन असते पण त्याच बरोबर एक प्रचंड मोठी जबाबदारी देखील असते. एका नव्या कुटुंबात प्रवेश होताच स्त्रीचे आयुष्य पार बदलून जाते. मी साकारत असलेल्या नंदिनीला रतनशी कुटुंबात सामील होण्याची उत्सुकता तर आहे, पण कुठे तरी एक छुपा तणाव आणि अस्वस्थता देखील आहे. नरेनचे वडील हेमराज एक गूढ चेतावणी उच्चारतात आणि रौनकने लपूनछपून केलेल्या कामामुळे गोंधळ वाढतो. नंदिनी नेहमीच समाजातील अनिष्टांविरुद्ध आवाज उठवत असते. आणि आता तिला आपल्या नव्या कुटुंबातील नात्यांमधील गुंतागुंतीचा हळूहळू शोध लागणार आहे.”
जी सत्ये प्रकाशात येतील त्याबद्दल नंदिनीची प्रतिक्रिया काय असेल? आणि रतनशी कुटुंबातील गुपिते उलगडताना तिच्या नरेनशी असलेल्या नात्याची कशी परीक्षा होणार आहे?
जाणून घेण्यासाठी बघत रहा, ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Comments
Post a Comment