विद्यार्थ्यांना सदर ठिकाणी संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

 डी फार्म मेगा जॉब फेअर मध्ये हजारो विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार


नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे द्वारा आयोजन संपन्न


पुणे : देशातील फार्मा सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल

फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये आयोजित मेगा जॉब फेअर मध्ये नोंदणी केलेल्यां पैकी हजारो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला आहे. या जॉब फेअर साठी तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मेगा जॉब फेअरला प्रमुख अतिथी म्हणून पीसीआय नवी दिल्लीचे मान्यता समितीचे सल्लागार डॉ. नरेंद्र गोवेकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार पुणे विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार  व तंत्रशिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयांचे सहाय्यक संचालक मारुती जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे, जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया,जे बी केमिकलचे संस्थापक श्रीधर जोशी, अभिनव वरवंड ग्रामीण शिक्षण संस्थाचे संस्थापक डॉ. विजयकुमार दिवेकर, एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ध्रुव जगताप,डॉ. महेश बुरांडे, डॉ. एच एम कदम यांच्यासह मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्रा. पोपटराव जाधव, व्हाईस चेअरमन डॉ. व्ही. एन. जगताप, सचिव डॉ. सचिन कोतवाल, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रा. प्रवीण जावळे, कोषाध्यक्ष एन. ए. पाटील यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलताना डॉ.गोवेकर म्हणाले की, दिवसेंदिवस फार्मा सेक्टर प्रचंड विकसित होत आहे. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील होत आहे, त्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत. युवकांना या संधी मिळवून देण्याचे काम अशा प्रकारचे मेगा जॉब करीत आहे. अशा प्रकारच्या मेळाव्यांना समाजातून हातभार लागल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. 

याप्रसंगी बोलताना अनुपमा पवार म्हणाल्या की, फार्मसी सेक्टरमध्ये कौशल्य प्राप्त केलेल्या युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मेघा जॉब फेयरला शासकीय स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल. 

कार्यक्रमांमध्ये मेगा जॉब फेअरला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजक व सहयोगीदात्यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉलमध्ये लगेच इंटरव्यूह घेण्यास सुरुवात झाली. दिवसभर चाललेल्या या मेगा जॉब फेअर मध्ये हजारो तरुण-तरुणींना हातोहात नियुक्तीपत्रे देण्यात आली.


विद्यार्थ्यांना सदर ठिकाणी संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.



कार्यक्रमासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील 46 डिप्लोमा फार्मसी महाविद्यालये सहभागी झाले होते व 30 फार्मास्युटिकल कंपनी, 2000 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. भविष्यात विद्यार्थी हितास्तव अजून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानत भविष्यात असाच मोठ्या स्तरावर देशव्यापी जॉब फेअर घेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.


सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी  मेगा जॉब फेअर च्या स्थानिक व्यवस्थापन समिती मधील डॉ. अमोल शहा, डॉ. रविंद्र चिंतामणी, प्रा. जी. एम. स्वामी, डॉ. संपत नवले, डॉ. अश्विनी शेवाळे, प्रा. प्रशांत हांबर, डॉ. योगेश बाफना, प्रा. संगीता देशपांडे, डॉ. प्रफुल्ल अडकर,फार्मसी क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवर , विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिशन महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी व युनिटी मेडीकेअर चे सागर पायगुडे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. सदर कार्यक्रमासाठी डॉ. आर व्ही शेटे , डॉ. एस एन ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन  अनिरुद्ध दडके व प्रियांका बोरुडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला