*"महाराष्ट्रातील गड-किल्ले व त्यांचे संवर्धन" या विषयावरील राज्यस्तरीय परिषद संपन्न*

*"महाराष्ट्रातील गड-किल्ले व त्यांचे संवर्धन" या विषयावरील राज्यस्तरीय परिषद संपन्न*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय (इतिहास विभाग) व शिक्षणाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील किल्ले या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेचे उद्घाटन डॉ. तेजस गर्गे (संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य) यांनी केलं. आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात त्यांनी जागतिक वारशासाठी नव्याने नामनिर्देशित झालेल्या गडकिल्ल्यां संदर्भातील माहिती व निर्देशनासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन केले. तसेच वारसा जतन करण्यासाठी योग्य व्यवस्थांच्या उभारणीची आवश्यकता प्रतिपादित केली.

दुर्गसंवर्धनावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन, पुरातत्त्व शास्त्रज्ञ व इतिहासकार डॉ. कुरुष दलाल यांनी केले. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत प्रश्न विचारून परिसंवादास सहभागी डॉ. सचिन जोशी (दुर्ग अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक), श्री. राहुल चेंबूरकर (वास्तुविशारद व वारसा संवर्धन सल्लागार) तसेच डॉ. तेजस गर्गे या तज्ज्ञ मंडळींकडून बहुमूल्य माहिती उपस्थित श्रोत्यांसाठी उपलब्ध केली. दुर्ग संवर्धनासाठी इच्छाशक्ती, जनजागृती, लोकसहभाग, अभ्यासूवृत्ति व योग्य मार्गदर्शनाची तसेच आर्थिक बळाची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष या परिसंवादात स्पष्ट झाला.

संवर्धन आर्किटेक तेजस्विनी आफळे यांनी दुर्ग संवर्धन प्रक्रियेतील विविध टप्पे सांगितले. जैवविविधता तज्ञ श्री. आनंद पेंढारकर यांनी किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता व त्याच्या संरक्षण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. किल्ले अभ्यासक व लेखक श्री. अमित सामंत यांनी किल्ल्यांवरील जलव्यवस्थापन या विषयावर सखोल सादरीकरण केले. तसेच श्री. महेंद्र गोवेकर यांनी नकाशातून दुर्ग भ्रमंती हा विषय मांडताना किल्ल्यांच्या नकाशाचे व महत्त्व सहभागींना पटवून दिल.

शोधनिबंध सादरीकरण्याच्या सत्रात राज्यभरातून आलेल्या अभ्यासकांनी किल्ल्यांच्या संबंधित नानाविध विषयांवर केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. परिषदेचा समारोप करताना श्री. सुधीर थोरात (कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ) यांनी दुर्ग संवर्धनातून संस्कृती संवर्धनाची आवश्यकता, तसेच त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यावर सहभागी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. शिवस्तुती गाऊन परिषदेचा समारोप करण्यात आला.

ह्या परिषदाचे आयाजनात श्री. कमलाकर इंदुलकर व श्री. राहुल मेश्राम ह्यांचं मुख्य योगदान होते.

Comments

Popular posts from this blog

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*