*अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं - हेमंत पाटील*
*अजित पवारांनी ओबीसीचे वाटोळं केलं - हेमंत पाटील*
पुणे : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला डावलण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. राज्यातील इतर प्रश्न हाताळताना अजित पवार जाणीवपूर्वक ओबीसी जनतेचे प्रश्न बाजूला काढून ठेवत होते. यावरून त्यांचा ओबीसींवर किती राग आहे हे कळते. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते ओबीसी समाजाला साद घालत आहेत. मात्र, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अजित पवारांनी ओबीसींचा वाटोळं केलं आहे, अशी परखड टीका इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.
हेमंत पाटील म्हणाले, ओबीसींवर षडयंत्र करून त्यांचा घात करण्याचं काम अजित पवार करत असतात. धनगर, मुस्लिम, ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अनेकदा अजित पवार यांना भेटून निवेदन दिली. मात्र त्यांनी कधीही त्यांची दखल घेतलेली नाही. राज्यातील इतर प्रश्न हाताळताना अजित पवार जाणीवपूर्वक ओबीसी जनतेचे प्रश्न बाजूला काढून ठेवत होते. यावरून त्यांचा ओबीसींवर किती राग आहे हे कळते. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यामधून अजित पवारांनी ओबीसी जनतेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आता निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार जाऊन ते मत मागत आहेत, ओबीसी जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही हेमंत पाटील यांनी केले आहे.
अजितदादांनी सतत ओबीसी जनतेवर अन्याय करून ओबीसी वॉटबँकवर पाणी सोडले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे त्यांना कळेलच, असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment