या रविवारी कॉमेडीचा जाणकार शेखर सुमन येणार ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ शो मध्ये

या रविवारी कॉमेडीचा जाणकार शेखर सुमन येणार ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ शो मध्ये
या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये विशेष अतिथी म्हणून शेखर सुमनचे आगमन होणार आहे. खदखदून हसवणारे गॅग्ज आणि धमाल गप्पा-गोष्टी आणि मस्ती यांनी भरलेल्या या भागात या शो मधले कसलेले कलाकार आपल्या कॉमिक टायमिंगने सगळ्यांना हास्य-चकित करतील.

 

दिग्दर्शकाच्या भूमिकेत गौरव दूबे सगळ्यांना पोट धरधरून हसवेल तर सिद्धार्थ सागर आणि सुगंधा मिश्रा मिळून ‘खिलजी अॅक्ट’ सादर करतील. गौरव मोरे ‘रंगीला’ चित्रपटातील आमिर खानची प्रसिद्ध भूमिका जिवंत करेल आणि हेमांगी कवी दैनिक मालिकेची अभिनेत्री बनून सगळ्यांना खूप हसवेल. इतकेच नाही, तर आपल्या टॉक शोजमुळे नावारूपाला आलेला शेखर सुमन एक स्टँड-अप अॅक्ट सादर करेल आणि त्यातून माणसाचे सामान्य जीवन आणि त्याच्या जीवनयात्रेत येणाऱ्या अडचणी यांचे चित्र उभे करेल. त्याच्या या अॅक्टला सर्वजण स्टँडिंग ओव्हेशनने दाद देताना दिसतील.

 

लिंक: https://www.instagram.com/reel/C6DwuEVr5Gm/?igsh=Z3MyazU0NWNrNWsz

 

या वीकएंडच्या भागाबद्दल बोलताना गौरव दूबे म्हणतो, “शेखर सुमनजींसमोर परफॉर्म करण्यास मी फार उत्सुक होतो. मला ते दिवस आठवले, जेव्हा ते एका शोमध्ये परीक्षक होते. त्यांनी माझ्या परफॉर्मन्सला तर दाद दिलीच, पण माझ्या यापूर्वीच्या कामाचे देखील त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले, तेव्हा तर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. शेखर सुमन इतरांना त्यांच्या कलेच्या प्रवासात मनापासून मदत करण्याची तयारी नेहमीच दाखवतात, हा गुण सेलिब्रिटीजमध्ये क्वचितच बघायला मिळतो.”

 

या रविवारी, अवश्य  बघा, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला