रोजगार देतो सांगून तरुणांची फसवणूक*

*रोजगार देतो सांगून तरुणांची फसवणूक*


*"उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून बेरोजगार तरुणांची फसवणूक"*


*कामाचा चांगला मोबदला देतो सांगून फसवणूक*
*पुणे,* रोजगार देण्याचे सांगून लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील आरजू टेक्सोल कंपनीविरोधात पुण्यातील एका तरुणांची फसवणूक झाल्याचं उघड झाले. वैभव कांबळे (वय 25, संपर्क +919881125907) या गुंतवणूकदाराने पुढे येत आपली 4 लाखांची फसवणूक झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.  मात्र या तरुणाची भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपींनी जून २०२१ मध्ये आरजू टेक्सोल हि कंपनी स्थापन केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडीलांच्या हस्ते कंपनीचे उदघाट्न झाले. गंतवणूक दारांची फसवणूक करण्यात मंत्री उदय सामंत यांचा मोठा हात असल्याचे या तरुणाने म्हंटले आहे.

२५ हजार ते ४० लाख रुपये पर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या स्कीम सांगून आरोपींनी फिर्यादी यांना द्रोण, पत्रावळ्या बनवण्याचे ॲटॉमिक मशीन, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या 4 लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच १५ महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.काही पेमेंट कॅश आणि काही पेमेंट ऑनलाईन केले आहे. याबाबतचे ॲग्रीमेंट देखील करून देतो असे आरोपींनी सांगितले होते. मात्र आजवर असे कोणतेही ॲग्रीमेंट केले नाही व मोबदला म्हणून कोणतीही रक्कम देखील दिली नाही असे तक्रारदराचे म्हणणे आहे. आरोपींनी संगनमताने  4 लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार दराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

२५ हजारापासून लाखो रुपये गुंतावणाऱ्या अनेकांची फसगत या कंपनीकडून झाल्याचे बोलले जात आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. अनेकांनी पै पै करून जमवलेले पैसे या कंपनीत गुंतवले होते. काही महिलांनी तर आपले दागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली होती.  

रत्नागिरीतील स्थानिकांमार्फत आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पुणे पोलीस गुन्हा नोंद करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे फिर्यादी वैभव कांबळे यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला