जीवन घडवण्या करिता ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी व पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत यातच प्रगती सामावलेली असते - सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज



जीवन घडवण्या करिता ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी व पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत यातच प्रगती सामावलेली असते -  सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज
पुणे महापालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग या शाळेतील ५ ते १० वी च्या विद्यार्थी व पालक यांच्याकरिता हरवलेले संस्कार या शीर्षकांतर्गत  प्रबोधन करण्याकरिता नाशिक येथील कपिकुल सिद्धपीठच्या पिठाधीश्वरी सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज व त्यांच्या उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांचे प्रबोधन पर व्याख्यान व चर्चासत्र माननीय उपमहापौर श्री आबा बागुल यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या संस्कार मालिकेत जीवन घडवण्या करिता ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी व पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत यातच प्रगती सामावलेली असते असे मोलाचे मार्गदर्शन कपिकुल सिद्धपीठच्या पिठाधीश्वरी सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज यांनी यावेळी पालक व विद्यार्थ्यांना दिला.

येणाऱ्या तरुण पिढीला आपल्या अध्यात्माचा पाया म्हणजेच आपली संस्कृती याची जोड मिळावी किंवा आधुनिकतेमध्ये आपले संस्कार कुठेही हरवू नये याकरिता शाळेमध्ये या उपक्रमांचे आयोजन माननीय आबा बागुल यांच्यातर्फे नेहमीच करण्यात येते त्यातील हे पाचवे पुष्प आज विद्यार्थी व पालक यांच्याकरिता आयोजित करण्यात आले होते..

 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन मा. श्री आबा बागुल व प्रमुख पाहूण्या सद्गुरु १००८ श्री वेणाभारती महाराज व त्यांच्या उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताकरिता शाळेतील विद्यार्थ्याकडून स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले..

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्रीकृष्णमयी यांनी ओंकार साधनेचे महत्त्व सांगत आपल्यातील पाच तत्त्वांचे पंचमहाभूते यांची देखील ओळख सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या अध्यात्मिक शक्तीचे, ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व  त्यांनी मुलांना संगीतले तसेच ओंकाराचा योग्य उच्चार देखील सर्व उपस्थित मुलांकडून व पालकांना कडून करून घेतला...

सद्गुरु वेणाभारती महाराज यांनी विद्यार्थ्यांना झुकण्याचे महत्त्व सांगत आपण आपल्या सर्व व्यक्तींना,वस्तूंना आदर दिला पाहिजे तसेच आपले जुने संस्कार हीच आपली आयुष्याची खरी शक्ती आहे, आणि सर्व पालकांनी या आपल्या संस्कृतीचे पालन आपल्या घरात प्रथम केले तरच मुले त्यांचे अनुकरण करतील, आपल्या पाल्याला सर्व गोष्टी आल्या पाहिजे या खटाटोपामध्ये खूप गोष्टी मुलांना सांगितल्या जातात तसे न करता मुलांचा कल, त्यांची आवड या सगळ्याचा विचार करून एकच कोणते तरी ध्येय जीवन घडवण्या करिता शोधले पाहिजे व त्याच दृष्टीने मुलांनी पालकांना आपले प्रयत्न ठेवले पाहिजे अशा प्रकारचे अतिशय सुंदर व मुलांना उपयोगी असे मार्गदर्शन यावेळी श्री गुरुदेवांनी केले...

व्याख्यानानंतर पालकांनी मुलांनी तसेच शिक्षकांनी गुरूंशी आपल्या शंका विचारून संवाद साधला...

 असे व्याख्यान अशा प्रकारचे प्रबोधन हे विविध शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आयोजित केले पाहिजे असे मत सर्वांनी व्यक्त केले...

 

कार्यक्रमास मा. उपमहापौर श्री आबा बागुल, पुणे नवरात्रो महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई बागुल, मा. उपमहापौर सरस्वती शेंडगे, शाळेचे प्राचार्य मसलकर , उपप्राचार्य रूपाली कदम, ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला