महापुरुषांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको
महापुरुषांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको
हडपसर येथील छत्रपतींच्या विटंबनेचे तीव्र पडसाद; नवले पूल, किवळे व गाडीतळ येथे आंदोलन
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखावा, तसेच विटंबना करणाऱ्यांवर सक्त कारवाई करणारा कायदा करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पुण्यात नवले ब्रिज, गाडीतळ हडपसर व किवळे याठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्ता रोखुन धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक येथेही आंदोलन झाले. काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. शेकडो महिला, तरुण कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, वारकरी बांधवानी आंदोलन सहभागी होत महापुरुषांच्या अपमानाचा निषेध नोंदवला.
महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, स्मारकांची व पुतळ्यांची होणारी विटंबना, हिंदू बांधवांवरील हल्ले हे हिंदू समाजाच्या अस्मितेवर घाला आहे. या सर्व घटना सहनशीलतेच्या पलीकडे जात आहेत. एक ठराविक समाज सातत्याने कटकारस्थान करून हिंदू महापुरुषांचा व राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करत आहे. यामुळे सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात येत आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्याची गरज असून, त्यासाठी कठोर शिक्षेचा कायदा पारित करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी पोलीस उपयुक्त संदीप सिंह गिल यांना दिले.

Comments
Post a Comment