'दीपस्तंभ मनोबल यशोत्सव-२४'चे रविवारी (दि. ३०) पुण्यात आयोजन

 'दीपस्तंभ मनोबल यशोत्सव-२४'चे रविवारी (दि. ३०) पुण्यात आयोजन

पुण्यात प्रथमच होणार दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

पुणे : दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल पुणे परिवारातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (दि. ३०) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे हा सोहळा होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी दिली.


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू, केंद्रीय अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, बजाज फिनसर्वच्या सीएसआर समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांची प्रमुख उपस्थिती, तर अंधत्त्वावर मात करुन आयएएस अधिकारी झालेले, पंजाबच्या सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त सचिव अजय अरोरा आणि '१२ वी फेल' हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे, ते पोलीस महासंचालक मनोज शर्मा उपस्थित असणार आहेत.

दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही देशातील पहिली दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व तंत्रज्ञानाचे निवासी विनामूल्य प्रशिक्षण देणारी स्वयंसेवी संस्था आहे. यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी यासह जे. जे. स्कुल ऑफ आर्टस्, टाटा इन्स्टिट्यूट अशा संस्थांच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे सर्व संयोजन दिव्यांग विद्यार्थी करणार आहेत. करिअरला दिशा देणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*