विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त 'शिवसंग्राम'तर्फे समाजोपयोगी कार्यक्रम
विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त
'शिवसंग्राम'तर्फे समाजोपयोगी कार्यक्रम
पुणे : लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्राम पक्षाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 'शिवसंग्राम'च्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या मागर्दर्शनाखाली बाणेर, बालेवाडी परिसरातील मूर्तिकार राजस्थानी लोकवस्तीच्या ठिकाणी महिलांना साडीचोळी व मुलांना कपडे, खाऊचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी, मेटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंहगड किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. कोथरूड येथील श्रीसाई सेवा मतिमंद निवासी आश्रमातील विद्यार्थ्यांना खाऊ, कपडे व अन्य साहित्याचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कांचन कदम, आधार फॉउंडेशनचे संचालक योगेश घाडगे व सुरज टाळकुटे, विजय कारकर, बापू खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमासाठी शिवसंग्रामचे युवा नेते शिवराज उगले, माऊली धुमाळ, विजयदादा कारकर, सुरत टाळकुटे, ओमकार कदम, प्रभाकर गोरडे, योगेश गाडगे, बापू खांडेकर, सिद्धेश्वर धांडे यांनी परिश्रम घेतले.
शिवराज उगले म्हणाले, "विनायकराव मेटे हे लोकनेते होते. तळागाळातल्या लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती. सामाजिक सेवेच्या भावनेतून त्यांनी अखेरपर्यंत काम केले. त्यांचा वारसा पुढे नेताना त्यांना अभिप्रेत अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन आदरणीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले."
Comments
Post a Comment