पांश्चजन्य फाऊंडेशन तर्फेविमलताई गरवारे प्रशालेतरक्तदान शिबिर संपन्न



पांश्चजन्य फाऊंडेशन तर्फे
विमलताई गरवारे प्रशालेत
रक्तदान शिबिर संपन्न

पुणे
(शहर प्रतिनिधी)
पुणे शहरात संसर्गजन्य रोगांच्या वाढीमुळे रक्तासह प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली व रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. पाञ्चजन्य फाउंडेशन आणि जनकल्याण रक्तकेंद्र यांनी रविवार दिनांक २८ जुलै रोजी सौ.विमलाबाई गरवारे प्रशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

या रक्तदान शिबिरांस शुभेच्छा देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिध्दार्थ शिरोळे व भाजप - पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे ह्यांनी पुणेकरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

शिबिराचे उद्घाटन जनता सहकारी बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप ह्यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून झाले. "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानांसारख्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी पुढे येऊन भाग घ्यायला हवा आणि समाजात ह्या विषयी जनजागृती करून एक सकारात्मक संदेश पोहोचवायला हवा." ...असे जगदीश कश्यप ह्यांनी ह्या प्रसंगी उदगार काढले. 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या डॉ.मधुरा बर्वे ह्यांनी येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची आरोग्याची आवश्यक ती चौकशी केली आणि प्रथम रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. 
शिबिरात ५ प्रथमच रक्तदान करणारे तरुण आले होते. 

शिबिरांस पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या स्वेच्छा रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

पाञ्चजन्य फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ राजे, सचिव समीर कुलकर्णी, सहसचिव रश्मिन कुलकर्णी, कोषाध्यक्ष पियुष कश्यप, विश्वस्त चंद्रभूषण जोशी, राजस जोशी व मंगेश देशपांडे यांनी सौ.विमलाबाई गरवारे शाळेचे व रक्तदात्यांसह जनकल्याण रक्तकेंद्राच्या डॉ. मधुरा बर्वे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

शिबिराच्या शेवटी जनकल्याण रक्तकेंद्राने पाञ्चजन्य फाउंडेशनला शिबिर उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल गौरव पत्र देऊन सन्मानित केले.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला