'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर*

*'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर*
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी'वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.  आता 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी 'आई भवानी', अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर