रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला
*रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला*
*( दोन दिवसीय प्रो डे परिषद उत्साहात पार )*
प्रॉप प्रोफेशनल रिअल्टर्स, नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स इंडिया आणि ब्रम्हा क्रॉप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "प्रॉप डे" परिषदेचे दिमाखात उद्घाटन
करण्यात आले. याप्रसंगी एन. ए. आर इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित चोप्रा, एमेरिटस एनएआर इंडियाचे अध्यक्ष रवि वर्मा, एनएआर इंडियाचे अध्यक्ष सुमंथ रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर प्रॉपचे अध्यक्ष दर्शन चावला व किशन मिलने, उपाध्यक्ष अभिजित सभरवाल, रमेश तोष्णीवाल, सचिव कीर्ती भोसले, खजिनदार विक्रम मलिक, मेहुल विठलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
दर्शन चावला म्हणाले, की प्रोफेशनल रिअल्टर्स या संस्थेचे रोपटे २०१६ लावले होते. गेल्या ८ वर्षात या रोपट्याचे रूपांतर महावटवृक्षात झाले असून याची पाळेमुळे पुण्याच्या कानाकोप ऱ्यात पोहचली आहेत. यामध्ये शेकडो सदस्य आहेत. प्रोफेशनल रिअलटर्स ऑफ पुणे ८ वा वर्धापन दिन साजरा केला. क्रीडाई पुणे मेट्रो मधील प्रमुख व्यक्ती जसे की अरविंद जैन, आदित्य जावडेकर, कपिल गांधी, अखिल अग्रवाल आणि दिलीप मित्तल उपस्थित होते.
सुमंथ रेड्डी म्हणाले भारतामध्ये रिअल्टर शिक्षण आणि प्रशिक्षण वाढविण्याचे त्यांचे दृष्टीकोन आणि धोरण स्पष्ट केले, ज्याचे उद्दिष्ट इंडस्ट्रीमध्ये उत्तम संघटना वाढवणे आहे. त्यांनी खरेदीदार, विक्रेते आणि रिअलटर्स यांच्यातील कनेक्शन सुलभ करण्यासाठी, विश्वासार्ह लीड्स आणि सुव्यवस्थित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी समर्पित एन. ए. आर इंडिया पोर्टलची योजना आखली.
रवि वर्मा म्हणाले रिअल इस्टेट क्षेत्रात शाश्वत यश मिळवण्या साठी ग्राहकांच्या समाधानाचे आणि हिताचे काम केले पाहिजे. रिअलटर्स यांनी हा कानमंत्र कायम लक्षात ठेवावे असे ते म्हणाले. दिलीप मित्तल यांनी पुण्यासाठी पीएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी भविष्यातील योजनांबद्दल अंतर्दृष्टी दिली, तर अखिल अग्रवाल यांनी महारेराच्या प्रमुख पैलूंचे स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमाचे आभार किशन मिलाने यांनी मानले तर सूत्रसंचालन रजत सचदेव यांनी केले.
Comments
Post a Comment