२०२३ मध्ये सात लाख ऐंशी हजार महाराष्ट्रीयन पर्यटकांनी केरळला भेट दिली

 २०२३ मध्ये सात लाख ऐंशी हजार महाराष्ट्रीयन पर्यटकांनी केरळला भेट दिली



पुणे :  केरळातील त्रिवेंद्रम (पदभानभ स्वामी मंदिर) कोवलम, अलाप्पुझा, कोची, मुन्नार, अथिरापल्ली, गुरुवायूर, वायनाड, कालिकत आदी पर्यटन स्थळांना पुणेकर भेट देण्यासाठी प्राधान्य देत आहेत.तसेच सध्या मल्याळम भाषेतील चित्रपटांच्या लोकप्रियतेचा चांगला परिणाम हा केरळच्या पर्यटनावर होत आहे. या चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी केरळची संस्कृती, चहाचे मळे, हाऊसबोट चांगले, केरळमधील गावकुसातील जीवनशैली यामुळे पर्यटक हे केरळकडे  आकर्षित होत आहेत. तसेच या प्रभावामुळे  डेस्टिनेशन वेडिंगसाठी ही केरळच्या पर्यटनस्थळांची निवड केली जात आहे, अशी माहिती केरळ पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री. अश्विन कुमार यांनी दिली.


अश्विन कुमार हे केरळ पर्यटन विभागाने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते .श्री. अश्विन कुमार पुढे म्हणाले की,करोना महामारीनंतर केरळच्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  तसेच केरळला भेट देण्याऱ्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची  संख्याही वाढली आहे.  साल २०२३ मध्ये सात लाख ऐंशी हजार महाराष्ट्रीयन पर्यटकांनी केरळला भेट दिली आहे. तर साल २०२२ मध्ये सहा लाख पन्नास हजार महाराष्ट्रीयन पर्यटकांनी केरळला भेट दिली होती. तर  केरळने २०२३ साली देशी पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली आहे. या काळात सुमारे दोन कोटी, अठरा लाख, एकहत्तर हजार  भारतीय पर्यटकांनी राज्याला भेट दिली. तर याच कालावधीत  सहा लाख,एकोणचाळीस हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी केरळला भेट दिली आहे. तसेच २०२४ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) पन्नास लाख सदतीस हजार भारतीय पर्यटकांनी केरळला भेट दिली आहे.


केरळ पर्यटन विभागाने हेलिसेवा, जी एक हेलिकॉप्टर-पर्यटन सेवा आहे, सुद्धा सादर केली आहे. यामुळे पर्यटक एका पर्यटनस्थळावरून दुसऱ्या पर्यटनस्थळापर्यंत लगेच पोहोचू शकतात. यामुळे केरळमधील दर्जेदार पर्यटनाला चालना मिळेल. यासोबतच, राज्यात कारव्हॅन पर्यटनही सादर करण्यात आले आहे. यामुळे पर्यटक हे राज्याच्या अंतर्गत आणि दुर्गम ग्रामीण भागांमध्ये जाऊन तेथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. शिवाय केरळमधील वर्कला हे शहर महासागरात सर्फिंग करण्यासाठी अत्यंत योग्य  असल्यामुळे आत्ता अनेक भारतीय व विदेशी पर्यटक या  शहराला मोठया प्रमाणात भेट देत आहेत. अशी ही माहिती  श्री अश्विन कुमार यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला