इंडियन फॉस्फेट लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री सोमवार, २६ ऑगस्टपासून



इंडियन फॉस्फेट लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री सोमवार, २६ ऑगस्टपासून
 
-     प्रति समभाग ₹ ९४/- ते ₹ ९९/- किंमत पट्टा निर्धारीत 
पुणे : फॉस्फेट आणि सुपर फॉस्फेटच्या उत्पादनांतील उदयपूरस्थित आघाडीची कंपनी इंडियन फॉस्फेट लिमिटेडने ₹१०/- दर्शनी मूल्याच्या समभागासाठी प्रत्येकी ₹९४/- ते ₹९९/- ची किंमत निश्चित  करून, प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (“आयपीओ” किंवा “ऑफर”) प्रस्तावित केला आहे. आयपीओ सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान १,२०० समभागांसाठी आणि त्यानंतर १,२०० समभागांच्या पटीत बोली लावू शकतात. कंपनी लिनियर अल्किलबेंझिन सल्फोनिक अँसिड ९०% (LABSA 90%), सिंगल सुपर फॉस्फेट (SSP), ग्रॅन्युल्स सिंगल सुपर फॉस्फेट (GSSP) यांची देशातील आघाडीची उत्पादक आहे.
 
· दर्शनी मूल्य ₹१०/- असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी ₹९४/- ते ₹९९/- चा किंमत पट्टा 
 
· आयपीओचे आकारमान: ₹ ६७.३६ कोटी.
 
· अँकर बोलीसाठी तारीख: शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४.
 
· रिटेल, एचएनआय, क्यूआयबी यांच्यासाठी आयपीओ खुला होण्याची तारीख - सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४  आणि बोली लावण्याची अंतिम तारीख - गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४.
 
· किमानतम बोली (लॉट) : १२०० समभाग
 
· अँकरसाठी राखीव कोटा: १९,२८,४०० समभाग
 
· क्यूआयबी कोटा: १२,८६,४०० समभाग
 
· एनआयआय कोटा: ९,६४,८०० समभाग
 
· किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कोटा: २२,५१,२०० समभाग
 
· मार्केट मेकर कोटा: ३,७३,२०० समभाग
 
आयपीओमध्ये ६७.३६ कोटी रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी होणाऱ्या समभागांच्या विक्रीचा समावेश आहे. त्यापैकी ३३.१८ कोटी रुपये तामिळनाडूच्या सिपकॉट इंडस्ट्रियल पार्क येथे लिनियर अल्किलबेंझिन सल्फोनिक अँसिड ९०% (LABSA 90%), सल्फ्युरिक अँसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट यांच्या निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा उभारण्यासाठी, २४.९० कोटी रुपये खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य उद्यम हेतूसाठी वापरात येणार आहेत. कंपनीने सिंगल सुपर फॉस्फेट खत, डाय-कॅल्शियम फॉस्फेट, सल्फ्युरिक अँसिड, ऑलियम ६५% आणि सेंद्रिय खते तयार करण्यासाठी धुळे, महाराष्ट्र येथे एमआयडीसीकडून १,००,००० चौ. मीटर जमीन भाडेतत्त्वावर मिळविली आहे. 
                
इंडियन फॉस्फेट लिमिटेड ची स्थापना सन १९९८ मध्ये करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी लिनियर अल्किलबेंझिन सल्फोनिक अँसिड ९०% (LABSA 90%), जे लाब्सा म्हणून प्रसिद्ध आहे, तयार करण्यात सखोल कौशल्य निर्माण केले आहे. हे उत्पादन सर्व प्रकारचे डिटर्जंट पावडर, डिटर्जंट केक, टॉयलेट क्लीनर आणि लिक्विड डिटर्जंट्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे ॲनिओनिक सर्फॅक्टंट आहे. कंपनी "सिंगल सुपर फॉस्फेट" (SSP) खत आणि "ग्रॅन्युल्स सिंगल सुपर फॉस्फेट" (GSSP) खताच्या निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. शेतकऱ्यांकडून यांना फॉस्फेट खत म्हणून प्राधान्य दिले जाते. कारण ते मातीला आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि इतर फॉस्फेट खतांच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.
 
कंपनीने त्यांच्या रसायने आणि खतांच्या प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया आणि नियंत्रण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. लाब्सा ९०% ची सध्याची उत्पादन क्षमता ३५० मेट्रिक टन प्रति दिन आहे आणि एसएसपी ची ४०० मेट्रिक टन प्रति दिन आहे.
 
कंपनी खासगी क्षेत्रातील समर्पित वितरक भागीदार तसेच संस्थात्मक भागीदारांद्वारे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये “अंकुर एसएसपी” या ब्रँड नावाखाली सिंगल सुपर फॉस्फेटची श्रेणी बाजारात आणली आहे.. कंपनी लाब्सा ९०% चा पुरवठा थेट त्यांच्या बी२बी ग्राहकांना त्यांच्या विविध उत्पादन केंद्रांवर करते.
 
आर्थिक वर्ष २०२४ साठी कंपनीचा परिचालन महसूल ७०४.१७ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२३ साठी ७६८.६९ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ साठी ५५७.१५ कोटी रुपये असा होता, तर याच आर्थिक वर्षांसाठी तिचा करोत्तर नफा अनुक्रमे १३.४७ कोटी रुपये, १६.५९ कोटी रुपये आणि १६.१६ कोटी रुपये असा होता. 
 
बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही या आयपीओची एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत. आयपीओपश्चात समभाग ‘एनएसई इमर्ज’वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
 
बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे होत असलेल्या आयपीओमध्ये एकूण विक्रीस खुल्या समभागाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसतील, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी निव्वळ ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी समभाग खुले नसतील आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध समभागांचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा कमी नसेल.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला