स्लाइस आणि नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या विलीनीकरणास एनसीएलटीची मान्यता
स्लाइस आणि नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या
विलीनीकरणास एनसीएलटीची मान्यता
पुणे :: ग्राहक पेमेंट आणि कर्ज वितरण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी असलेल्या स्लाइस आणि नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या (एनईएसएफबी) विलीनीकरणास राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) ने मंजुरी दिली आहे. एनसीएलटीच्या गुवाहाटी खंडपीठाने गॅरेजप्रुन्युअर्स इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड, क्वाड्रिलियन फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, इंटरगॅलेक्टरी फाऊंड्री प्रायव्हेट लिमिटेड, आरजीव्हीएन (नॉर्थ इस्ट) मायक्रोफायनान्स लिमिटेड आणि नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपन्यांचा समावेश असलेल्या व्यवस्था आणि एकत्रीकरणाच्या योजनेला मंजुरी दिली आहे.
उभय कंपन्यांच्या अधिकृत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे भारतीय ग्राहकांना उत्कृष्ट आर्थिक अनुभव प्रदान करण्यासाठी एनइएसएफबीचे तळागाळापर्यंत असलेले बँकिंग कौशल्य आणि स्लाइसच्या डिजिटल ताकद यांचा मिलाफ झाला आहे. सदर विलिनीकरणासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय), रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी), प्रादेशिक संचालक (आरडी) यांची महत्वपूर्ण मंजुरीने तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि प्राप्तिकर विभाग यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारावर करण्यात आले आहे. विलीनीकरणामुळे एकत्रित संस्था प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास आणखी सक्षम होणार आहे. तसेच समुदायांबाबत त्यांचे ज्ञान आणखी विस्तारून संपूर्ण देशामध्ये आर्थिक समावेशनाच्या प्रक्रियेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या विलीनीकरणामुळे ग्राहकांना उत्पादनांची विस्तारलेली श्रेणी, वर्धित ओम्नी चॅनलचे पर्याय आणि अखंड बँकिंगचा अनुभव मिळणार आहे.
विलीनीकरणाच्या मान्यतेबद्दल भाष्य करताना, स्लाइसचे संस्थापक आणि सीईओ राजन बजाज म्हणाले, “या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्वांचा आणि प्रतिष्ठित नियामक संस्थांचा विश्वास आणि समर्थन यासाठी आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत. स्लाइसमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही मंजुरी अत्यंत सर्वसमावेशक आणि जबाबदार बँकिंग वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या समर्पणाला बळ देते. हे विलीनीकरण आमच्या साठी एक महत्वाचा टप्पा तर आहेच पण बँकिंग अनुभवांची पुनर्परिभाषित करण्यासाठी आणि सर्वांसाठी सुलभता विस्तारण्यासाठी आमच्या सामायिक समर्पणाचा एक पुरावा आहे. एनइएसएफबी मध्ये विलीन होण्यास आम्ही उत्साहित आहोत आणि एकत्रितपणे, आम्ही आर्थिक प्रवेश, तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग प्रणाली आणि ग्राहक सेवा यांमध्ये नाविन्यपूर्ण आणि बळकट करत राहू.”
स्लाइस आणि एनइएसएफबी लवकरच प्रभावी विलीनीकरणाची तारीख आणि विलीन झालेल्या घटकाचे तपशील जाहीर करतील. येत्या काही महिन्यांत, दोन्ही संस्था सर्व ग्राहक, कर्मचारी आणि भागधारकांसाठी सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य करतील, सेवा आणि समर्थनाची सर्वोच्च मानके राखण्यावर लक्ष केंद्रित करतील. हे विलीनीकरण आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण टेक सोल्यूशन्सद्वारे नवीन उद्योग बेंचमार्क सेट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते.
About slice
slice, feel easy with money.
slice is India’s leading consumer payments and credit company focused on providing financial services to Indians. Trusted by more than 18 million Indians, slice is a market leader in this rapidly growing segment. The company aims to build a smart, innovative, and transparent financial platform that is loved by its consumers. slice app brings a fast and simple way to make payments and access credit through its cornerstone products: slice UPI first account and slice borrow. slice’s purpose is to advance the way money works for the world, with a major focus on providing the best consumer experience.
Comments
Post a Comment