नारायण सेवा संस्थानचा मोफत मॉड्युलर आर्टिफिशियल लिंब फिटमेंट कॅम्प २९ सप्टेंबरला
नारायण सेवा संस्थानचा मोफत मॉड्युलर आर्टिफिशियल लिंब फिटमेंट कॅम्प २९ सप्टेंबरला
• टिंगरे नगर, तिरुपती गार्डन येथे ३६० दिव्यांगांना लावले जाणार कृत्रिम अवयव
पुणे, २७ सप्टेंबर: देश-विदेशात दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थान तर्फे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्य देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी पुण्यात मोफत नारायण लिंब आणि कॅलीपर्स फिटमेंट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर तिरुपती गार्डन मंगल कार्यालय, टिंगरे नगर, रोड नं. २, विश्रांतवाडी येथे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.
नारायण सेवा संस्थानचे मीडिया व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संस्थान गेल्या ३९ वर्षांपासून विविध राज्यांमधील दिव्यांग बंधू-भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या परंपरेत, ९ जून रोजी संस्थानने पुण्यात मोफत लिंब मेजरमेंट कॅम्प आयोजित केला होता, ज्यात सुमारे ५०० लोक सहभागी झाले होते. यापैकी ३६० जणांना कृत्रिम अवयव बसविण्याचा निर्णय घेतला गेला. आता त्यांचे हात-पाय लावण्यासाठी शिबिर आयोजित केले जात आहे.
गौड़ यांनी सांगितले की, नारायण सेवा संस्थानने रायपूर, लखनऊ, कोलकाता, जयपूर, विशाखापट्टणम, गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये अशा प्रकारचे शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. पुण्यातील शिबिरासाठी 25 पेक्षा अधिक स्वयंसेवी संघटना, जसे की रामा हॉस्पिटॅलिटी, यशश्वी ग्रुप, अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन, राउंड टेबल इंडिया, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय, जय शिवराय प्रतिष्ठान आणि इतर संस्था एकत्र येऊन काम करणार आहेत.
पुण्यातील या शिबिरात 360 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोफत लिंब बसवून एक नवीन जीवनदान दिले जाणार आहे. यासाठी संस्थानने केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना, प्रशासकीय अधिकारी, आणि समाजसेवकांना आमंत्रित केले आहे. दिव्यांगांना शिबिरामध्ये मोफत जेवण आणि फिटमेंटनंतर चालण्याचे प्रशिक्षण तसेच उपकरणांच्या वापर व देखभालीची माहिती दिली जाणार आहे.
नारायण सेवा संस्थान 1985 पासून मानवसेवेत कार्यरत आहे. संस्थापक कैलाश मानव यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकल्पांद्वारे त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून सशक्त बनवले आहे.
माध्यम संपर्क: अश्वमेध कम्युनिकेशन्स, कैवल्य- ९९२१४४६६९०
Comments
Post a Comment