राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तर्फे मोर्चाचे आयोजन*

*राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तर्फे मोर्चाचे आयोजन* 

 *राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा निघणार* 
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली हा विशाल मोर्चा १ ऑक्टोबर रोजी स. ११ वा मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडणार आहे. सदरील मोर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्मकार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सामील होऊन चर्मकार समाजाच्या विविध मागण्या मागण्यासाठी ते एकत्र येणार आहेत. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आनंद गवळी (राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुदाम लोखंडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), राजाभाऊ पोटे (प्रदेश उपाध्यक्ष), संतोष टोणपे (पुणे शहर आयक्ष), उत्तरेश्वर कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष), विलास चव्हाण (पुणे शहर उपाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते. 
खालील विविध मागण्या चर्मकार महासंघाच्या वतीने मागण्यात आले आहेत. • प्रलंबित असलेली सर्व कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावीत. • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत असे कार्यालये देऊन जिल्हा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात यावीत.• मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावेत. • राज्यातील गटई कामगारांना गटई स्टॉलचे त्वरित वाटप करण्यात यावे. • चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसायाची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी. • राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये "संत रविदास भवना" साठी जागा उपलब्ध करून देवून संत रविदास भवन बांधून देण्यात यावे. 

अशा विविध मागण्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मागण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने करण्यात आले आहे.

फोटोओळ - डावीकडून सुदाम लोखंडे, संतोष टोणपे, राजाभाऊ पोटे, आनंद गवळी, विलास चव्हाण, उत्तेश्वर कांबळे आदी मान्यवर 


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला