सुपर ३० फेम पद्मश्री आनंद कुमार यांच्या आगामी चित्रपट 'आयुष्मती गीता मॅट्रिकपास’ १८ ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार*

*सुपर ३० फेम पद्मश्री आनंद कुमार यांच्या आगामी चित्रपट 'आयुष्मती गीता मॅट्रिकपास’ १८ ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार* 

*आयुष्मती गीता मॅट्रिकपास’ १८ ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार* 
               "आयुष्मती गीता मॅट्रिक पास" हा चित्रपट १८ ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी पुणे येथे सुपर ३० चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार उपस्थित पार पडला. यावेळी  अतुल श्रीवास्तव, निर्माता शानू सिंग राजपूत देखील उपस्थित होते.  चित्रपटाचे कथानक असे आहे कि  गीता, ग्रामीण भारतात वाढलेली मुलगी आहे. गीता एका मुलाच्या प्रेमात पडते, परंतु प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे या लग्नातही अडथळे येतात. मुलीचे वडील आपल्या मुलीला मॅट्रिक पास झाल्यावरच लग्न करण्यास सांगतात. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला गावातील शाळेत पाठवण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर शिक्षण हा आपल्या मुलीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याची तिला शिकवतात ?
                "स्त्रियांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय सशक्त भारत कसा निर्माण होणार?" स्त्री शिक्षणाबाबत जनजागृती करणाऱ्या या चित्रपटातील संवाद हृदयस्पर्शी आहेत. ""बेटी बचाओ, बेटी पढाओ" मोहिमेला चालना देणारा "आयुष्मती गीता मॅट्रिक पास" हा चित्रपट एक प्रेमकथा तसेच कौटुंबिक नाट्य आहे, ज्यात विनोदाच्या छटा आणि संगीताचा परिस्पर्श आहे.
               दिग्दर्शक प्रदीप खेरवार म्हणाले, “गीता ही या देशातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज आहे, ज्यांच्यावर तिच्या लग्नापासून ते अभ्यासापर्यंत हे प्रश्न उपस्थित केले जातात.  गुड आयडिया फिल्म्स आणि स्पंक प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रदीप खैरवार, शानू सिंग राजपूत यांनी केली आहे, जेके एंटरटेनमेंट आणि पेंटेक इंटरनॅशनल यांनी सहनिर्माते आहेत. फॅमिली ड्रामा चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली येथे झाले आहे. हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४  रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित  होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला