सीटी पंडोल अँड सन्स गोल्फ कप २०२४ स्पर्धेत जगदीप सिंग याला विजेतेपद

सीटी पंडोल अँड सन्स गोल्फ कप २०२४ स्पर्धेत जगदीप सिंग याला विजेतेपद
पुणे, 23 सप्टेंबर 2024: सीटी पंडोल अँड सन्स आणि ओमेगा वॉचेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीटी पंडोल अँड सन्स गोल्फ कप २०२४ स्पर्धेत जगदीप सिंग याने विजेतेपद संपादन केले.

पुण्याच्या पूना गोल्फ कोर्सवर झालेल्या या स्पर्धेत जगदीप सिंग यांनी १८ हँडिकॅपसह ४२ गुण मिळवून विजेतेपद पटकावले. सिंग यांनी १०व्या होलवर बर्डी केली आणि पाच पार्स मिळवत एकदिवसीय स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. स्टेबलफोर्ड फॉरमॅटमध्ये खेळविलेल्या या स्पर्धेत एकूण ९१ गोल्फर सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या दिवशी उत्तम हवामान आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेचा अनुभव होता. सहभागी गोल्फपटूनी सीटी पंडोल अँड सन्सच्या उत्तम आतिथ्याचे आणि निर्दोष आयोजनाचे कौतुक केले. सर्व व्यवस्था, टी-ऑफपासून ते भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यापर्यंत, अत्यंत शिस्तबद्ध होती. पारितोषिक वितरण समारंभात कावास पंडोल यांच्या उपस्थितीत, होरमुझ पंडोल आणि ओमेगा इंडियाचे सुमित के शर्मा यांनी पारितोषिक वितरण केले.

कार्यक्रमाच्या यशानंतर कावास पंडोल म्हणाले, “ओमेगासोबत ही स्पर्धा आयोजित करणे हा एक आनंददायक अनुभव होता. गोल्फच्या अचूकते आणि ओमेगाच्या घड्याळांच्या उत्कृष्टतेमधील समन्वय अद्वितीय आहे. आम्ही पुढील वर्षी पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहोत.”

सीटी पंडोल अँड सन्स पुढील आठवड्यात आपली ११६ वी वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी करत आहेत, आणि हा गोल्फ स्पर्धा त्यांच्या समृद्ध परंपरेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जोडतो. शंभराहून अधिक वर्षांपासून, सी टी पंडोल अँड सन्स हे लक्झरी आणि कौशल्य यांचे प्रतीक आहे, ज्यांनी प्रतिष्ठित घड्याळांची एक उत्कृष्ट श्रेणी सादर केली आहे. त्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैयक्तिक सेवेसाठीच्या वचनबद्धतेमुळे ते पुण्यातील लक्झरी घड्याळांचे प्रमुख ठिकाण बनले आहेत.  ही स्पर्धा सी टी पंडोल अँड सन्स, भारतातील सर्वात जुने लक्झरी वॉच रिटेलर आणि ओमेगा वॉचेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित करण्यात आली होती, ज्यांनी क्रीडा आणि लक्झरी यांच्या साजेश्या अनुभवाची परंपरा पुढे चालू ठेवली.

स्पर्धेचे निकाल:

एकूण विजेता: जगदीप सिंग (४२ गुण)
इतर विजेते:
हँडिकॅप १९ आणि त्याहून अधिक विजेता: आदित्य मिश्रा (३९ गुण)
हँडिकॅप १९ आणि त्याहून अधिक उपविजेता: तृप्ती अब्भी (३७ गुण)
हँडिकॅप १३ ते १८ विजेता: विकास शेवारे (३९ गुण)
हँडिकॅप १३ ते १८ उपविजेता: हितेंद्र यादव (३८ गुण)
हँडिकॅप ० ते १२ विजेता: अमन सिवाच (३९ गुण)
हँडिकॅप ० ते १२ उपविजेता: यश वाधवान (३६ गुण)

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला