क्रॉम्‍प्‍टनने महाराष्‍ट्रात महिला इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण उपक्रम सुरू करत लैंगिक समानतेच्‍या दिशेने पुढाकार घेतला

क्रॉम्‍प्‍टनने महाराष्‍ट्रात महिला इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण उपक्रम सुरू करत लैंगिक समानतेच्‍या दिशेने पुढाकार घेतला


मुंबई, २४ ऑक्‍टोबर २०२४: क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.ला अग्रगण्‍य उपक्रम 'सक्षम'च्‍या दुसऱ्या बॅचच्‍या लाँचची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या उपक्रमाचा महिलांना इलेक्ट्रिकल उद्योगामध्‍ये सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. टाटा स्‍ट्राइव्‍हसोबत सहयोगाने हा अद्वितीय उपक्रम वंचित समुदायांमधील तरूण महिलांना असमकालीन एसटीईएम पदांमध्‍ये प्रशिक्षण देत सक्षम करतो, ज्‍यामुळे अधिक सर्वसमावेशक भविष्‍यासाठी मार्ग सुकर झाला आहे, जेथे महिला प्रगती करू शकतील.  

पहिल्‍या बॅचच्‍या यशाला अधिक पुढे घेऊन जात क्रॉम्‍प्‍टनचा सक्षम उपक्रम इलेक्ट्रिकल उद्योगामधील लैंगिक तफावतीला दूर करत राहिल, ज्‍यासाठी महिलांना टेक्निकल पदांमध्‍ये निपुण होण्‍याकरिता आवश्‍यक कौशल्‍ये व प्रमाणन देत आहे. या उपक्रमाच्‍या सर्वसमावेशक अभ्‍यासक्रमामध्‍ये क्‍लासरूम अध्‍ययनासह प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे, जे सहभागींना यशस्‍वी करिअर घडवण्‍यासाठी व्‍यावहारिक ज्ञान व आत्‍मविश्‍वासासह सुसज्‍ज करते.

भारतातील इलेक्ट्रिकल उद्योगामध्‍ये मोठी लैंगिक तफावत दिसून आली आहे, जेथे टेक्निकल पदांमध्‍ये महिलांचे प्रतिनिधीत्‍व कमी आहे. या तफावतीसाठी विविध घटक कारणीभूत असू शकतात, जसे सामाजिक रूढी, संबंधित प्रशिक्षण संधी मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आणि क्षेत्रातील करिअर पर्यायांबाबत जागरूकतेचा अभाव. तसेच, ग्रामीण भागांमध्‍ये सांस्‍कृतिक नियम व पालकत्‍व समस्‍यांमुळे टेक्निकल शिक्षण आणि प्रशिक्षण उपक्रमांमध्‍ये मुलींच्‍या सहभागास अडथळा निर्माण होतो.   

या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी क्रॉम्‍प्‍टनने टाटा स्‍ट्राइव्‍हसोबत सहयोगाने 'सक्षम' उपक्रम सुरू केला आहे. या अग्रगण्‍य उपक्रमाचा महाराष्‍ट्रातील तरूण महिलांना इलेक्ट्रिकल उद्योगामध्‍ये करिअर घडवण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून क्रॉम्‍प्‍टनने अहमदनगर व नाशिक येथील गावांमधील ___ हून अधिक महिलांना यशस्‍वीरित्‍या प्रशिक्षित केले आहे, तसेच त्‍यांना कुशल सहाय्यक इलेक्ट्रिशियन्‍स बनण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍ये आणि प्रमाणनांसह सुसज्‍ज करत आहे. 

'सक्षम' उपक्रम टेक्निकल प्रशिक्षण देण्‍यासोबत पुढील बाबींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे: 

  • महिला सक्षमीकरण: हा उपक्रम महिलांना असमकालीन करिअर घडवण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास व कौशल्‍यांसह सुसज्‍ज करतो, तसेच स्‍थानिक तरूणींना उदरनिर्वाह संधी देतो आणि आर्थिक स्‍वावलंबीत्‍वाला चालना देतो. 

  • अडथळ्यांचे निराकरण: प्रशिक्षण व प्‍लेसमेंट संधी देत हा उपक्रम सक्रियपणे सामाजिक रूढींना आव्‍हान करतो आणि कर्मचारीवर्गामध्‍ये अधिक सर्वसमावेशकतेसाठी मार्ग सुकर करतो. 

  • आदर्श व्‍यक्‍तींची निर्मिती: बहुतांश फर्स्‍ट-जनरेशन विद्यार्थी असलेले पदवीधर भावी पिढ्यांसमोर आदर्श ठेवतात, तसेच इतर महिलांना त्‍यांच्‍या पावलांवर पाऊल ठेवण्‍यास प्रेरित करतात. 

कंपनीच्‍या या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष म्‍हणाले, ''क्रॉम्‍प्‍टनमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, वैविध्‍यपूर्ण कर्मचारीवर्ग असणे योग्‍य असण्‍यासोबत आमच्‍या सातत्‍यपूर्ण यशासाठी आवश्‍यक आहे. म्‍हणून आम्‍हाला सक्षम उपक्रम राबवण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम सर्वोत्तम प्रशिक्षण देतो. आम्‍ही या तरूण महिलांसाठी पारंपारिकरित्‍या प्रतिबंधित असलेल्‍या क्षेत्रात प्रवेश करण्‍याचे दरवाजे खुले करत आहोत, तसेच महिलांच्‍या भावी पिढीला इलेक्ट्रिकल क्षेत्रात करिअर घडवण्‍यास प्रेरित करत आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की या पदवीधर महिलांचे इलेक्ट्रिशियन्‍स म्‍हणून यशस्‍वी करिअर असेल, तसेच त्‍या इतरांसाठी आदर्श व्‍यक्‍ती देखील ठरतील.'' 

ते पुढे म्‍हणाले, ''आमचा विश्‍वास आहे की, सक्षम सारखे उपक्रम व्‍यवसायासाठी सर्वोत्तम असण्‍यासोबत अधिक समान व सर्वसमावेशक समाज घडवण्‍यासाठी आवश्‍यक देखील आहेत. आम्‍ही बदल घडवून आणण्‍यामध्‍ये आमची भूमिका बजावण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच सक्षम उपक्रमाचा सहभागींच्‍या जीवनात आणि इलेक्ट्रिकल उद्योगामध्‍ये होणारा सकारात्‍मक परिणाम पाहण्‍यास उत्‍सुक आहोत.''

नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) आणि टाटा ट्राइव्‍हद्वारे प्रमाणित ३-महिन्‍यांच्‍या निवासी उपक्रमाला जानेवारी २०२४ मध्‍ये सुरूवात झाली आणि क्‍लासरूम अध्‍ययनासह व्‍यावहारिक ऑन-द-जॉब प्रशिक्षण देत सहभागी त्‍यांच्‍या निवडलेल्‍या क्षेत्रात निपुण कामगिरी करण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍यांसह सुसज्‍ज असण्‍याची खात्री घेतली. तसेच, या उपक्रमामध्‍ये क्रॉम्‍प्‍टनची सहयोगी टाटा स्‍ट्राइव्‍ह देखील पदवीधर प्रशिक्षणार्थींसाठी प्‍लेसमेंट दर ७० टक्‍के असण्‍याची खात्री घेत आहे. याव्‍यतिरिक्‍त, जवळच्‍या उद्योगांनी या उच्‍च कुशल महिलांना रोजगार संधी देण्‍याप्रती रूची देखील व्‍यक्‍त केली आहे. 

महिला आर्थिक विकास महामंडळ (एमएव्‍हीआयएम) सोबत धोरणात्‍मक सहयोगाच्‍या माध्यमातून क्रॉम्‍प्‍टन खात्री घेते की, प्‍लेसमेंट्स शाश्‍वत असतील आणि सहभागींना कर्मचारीवर्गामधील त्‍यांच्‍या पहिल्‍या वर्षादरम्‍यान सतत मार्गदर्शन व मूल्यांकन मिळत राहिल. 

इलेक्ट्रिकल क्षेत्रातील आपल्‍या कौशल्‍याचा फायदा घेत क्रॉम्‍प्‍टन या महिलांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्‍याप्रती, तसेच त्‍यांना यशस्‍वी करिअरसाठी सुसज्‍ज करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.   

क्रॉम्प्टन विषयी:

८५ वर्षांहून प्रदीर्घ असा ब्रॅण्डचा वारसा लाभलेली क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लिमिटेड ही फॅन्स (पंखे) व निवासी पंपांच्या विभागातील भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांत कंपनीने आधुनिक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणारी अनेकविध नाविन्‍यपूर्ण उत्पादने देण्यासाठी सातत्याने प्रयत्‍न केले आहेत. यामध्ये उत्तम दर्जाचे व उच्‍च कामगिरी करणारे पंखे, पंप्‍स, लायटिंग सोल्‍यूशन्‍स आणि वॉटर हिटर्स, एअर कूलर्स सारखे इतर श्रेणी, मिक्‍सर ग्राइंडर्स, एअर फ्रायर्स, ओटीजी, इलेक्ट्रिक केटल्‍स इत्यादी सारखे लहान किचन अप्‍लायन्‍सेस, इस्‍त्रीसारखी इतर होम अप्‍लायन्‍सेस आणि बिल्‍ट-इन किचन अप्‍लायन्‍सेस यांच्या अनेकविध श्रेणींचा समावेश होतो. कंपनीने ब्रॅण्ड आणि नाविन्‍यपूर्ण संशोधनामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात व पूर्ण करतात येतातच, शिवाय ऊर्जा कार्यक्षमतेलाही चालना देण्यात मदत होते. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायाला आवश्यक असे सुस्थापित आणि संघटित वितरण नेटवर्कही कंपनीने विकसित केले आहे. देशभरातील भक्‍कम डीलरबेसद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा पुरवली जाते तसेच विक्री-पश्‍चात्त सेवाही कार्यक्षमतेने दिल्या जातात.


कंपनीचा सातत्‍यपूर्ण फोकस आणि मोहिमेने ऊर्जा-कार्यक्षम उत्‍पादनांचा विकास करण्‍यास मदत केली आहे आणि या प्रयत्‍नांसाठी अनेक मान्‍यता व पुरस्‍कार मिळाले आहेत. कंपनीला ऊर्जा मंत्रालयाच्‍या ब्‍युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्‍सीद्वारे तीन प्रतिष्ठेचे नॅशनल एनर्जी कंझ्युमर अवॉर्ड्स (एनईसीए) प्राप्‍त झाले आहेत. २०२३ मध्ये भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आलेल्‍या पुरस्काराने कंपनीच्या स्टोरेज वॉटर हीटरला मान्यता दिली. २०१९ मध्ये, ब्रँडने दोन श्रेणींमध्ये यश मिळवले: सीलिंग फॅन आणि एलईडी बल्ब. याव्यतिरिक्‍त, डेलॉइट प्रायव्हेटने कंपनीला इंडियाज बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनीज २०२२ म्‍हणून मान्‍यता दिली आणि डन अॅण्‍ड ब्रॅडस्‍ट्रीट इंडियाने 'इंडियाज टॉप ५०० कंपनीज २०२२'मध्‍ये सूचीबद्ध केले. डब्ल्यूपीपी आणि कंतार यांनी २०२० साली प्रसिद्ध केलेल्या आघाडीच्या सर्वांत मौल्यवान ७५ भारतीय ब्रॅण्‍ड्सच्या यादीतही कंपनीला स्थान देण्यात आले. याशिवाय हेराल्ड ग्लोबल आणि बीएआरसी आशिया यांनी ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिकलच्या विभागात क्रॉम्प्टनला ब्रॅण्ड ऑफ द डिकेड २०२१ म्हणून मान्यता दिली.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला