स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर*

*स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर* 

 *( पहिल्या दिवशी तिकीट बारीवर ₹ १ कोटी ७२ लाखांचे कलेक्शन* 
"कर्मयोगी आबासाहेब"  गणपतराव देशमुख यांचा धगधगता प्रवास रुपेरी पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार दिवंगत माजी कॅबिनेट मंत्री गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध या चित्रपटातून घेतला गेला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा नुकताच पुण्यातील सिटी प्राईड 
चित्रपटगृहात उत्साहात पार पडला याप्रसंगी चित्रपटातील कलाकार अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, निकिता सुखदेव चित्रपटाचे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख असे अनेक मान्यवर उपस्थित होते. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी तिकीट बारीवर १ कोटी ७२ लाख रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे. या चित्रपटातून माननीय गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घडत आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी  काम पाहिले आहे.

रामकुमार शेडगे - जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस - 9890775696

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला