वाढत्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या MontClaire/मॉंक्लेयर द्वारे UrbanWrk/अर्बन वर्क पुण्यातील त्यांच्या उपस्थितीचा विस्तार केला आहे.

वाढत्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या MontClaire/मॉंक्लेयर द्वारे UrbanWrk/अर्बन वर्क पुण्यातील त्यांच्या  उपस्थितीचा विस्तार केला आहे.



पुणे, 25 ऑक्टोबर, 2024: UrbanWrk/अर्बनवर्क पश्चिम पुण्यातील त्यांच्या MontClaire/मॉंक्लेयर या अद्ययावत केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा अभिमानाने करत आहेत. UrbanWrk/अर्बनवर्क च्या पुण्यातील विस्तार होत असलेल्या पोर्टफोलियोतील सहावी जोड असणारे MontClaire/मॉंक्लेयर, पुण्याच्या समृध्द होत असलेल्या आयटी केंद्राच्या सान्निध्यासाठी धोरणात्मक रित्या निवडण्यात आले असून ते मेट्रोशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे व ते व्यवसायांना शहराचा नयनरम्य देखावा असणार्‍या उत्कृष्ट ठिकाणांवर कार्यालयीन जागा देऊ करते.

प्रभावशाली 1.35 लाख चौ. फूटांचा विस्तार असणार्‍या या नवीन जागेत अत्त्युच्च दर्जाच्या सुविधा आहेत व त्यामुळे ती आपले कार्य विस्तारित करू इच्छिणार्‍या प्रेरित आय टी कंपन्यांसाठी अग्रणी कार्यस्थळ स्थान बनते. या जागेत दुहेरी-काचेचा दर्शनी भाग असणारे ध्वनीरोधक मीटिंग कक्ष आहेत ज्या गोपनीयता आणि कमीत कमी व्यत्यय यांची खात्री करतात. UrbanWrk/अर्बनवर्कचा, कार्यस्थळावरील अनुभव वृध्दिंगत करणारे नैसर्गिक व सुखावह वातावरण निर्माण करण्यासाठी वनस्पती व कार्यस्थळांचा बेमालूम संगम करणाकरण्यासाठी निसर्ग व मानव यांचा मिलाप साधणार्‍या डिझाइनवर विश्वास आहे. MontClaire/मॉंक्लेअरच्या ठळक विशिष्ट्यांपैकी एक म्हणजे 5,600 चौ फूट आकाराचे नेत्रदीपक टेरेस जेथून नयनरम्य देखावा दिसतो व जे अनौपचारिक भेटी आणि एकाग्र काम या दोन्हीसाठी एक परिपूर्ण आयोजन आहे.

MontClaire/मॉंक्लेअर हे गतीशील कार्य पर्यावरणास मदत करणारी IoT-सक्षम केंद्रे, उच्च-गती वाय-फाय आणि  विराम क्षेत्रे या सारख्या नावीन्यपूर्ण पायाभूत संरचनांद्वारे, आय टी कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष प्रकारे निर्माण केले आहे. याचे डिझाइन अतिसूक्ष्मवाद म्हणजेच मिनिमॅलिझम तत्त्वज्ञान आणि जिव्हाळा यांचा मिलाप करते आणि एक शांत व आधुनिक स्थान निर्माण करते. पिंगट आणि लाकडी घटक एक कालातीत रूप देऊ करतात तर फर्निचर आराम देते. काचेच्या बाह्य दर्शनी भागातून नैसर्गिक प्रकाश झिरपतो आणि नेत्रदीपक देखावा आणि अधिक सुखावह कार्य अनुभव देतो.

या लॉंचवर वक्तव्य करताना, UrbanWrk/अर्बनवर्कचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व संस्थापक अनुज मुनोत म्हणाले, "पुण्याची समृध्दीच्या वाटचालीवरील तंत्रज्ञान केंद्र म्ह्णून निरंतर प्रगती चालू आहे आणि MontClaire/मॉंक्लेअरच्या माध्यमातून आमच्या उपस्थितीचा विस्तार करण्याची संधी आम्हाला दिसून आली. ही नवीन जागा आय टी कंपन्या व स्टार्ट-अप्स यांचा काम करण्याचा अनुभव वरच्या स्तरावर नेण्यासाठी डिझाइन करण्यात्त आली असून ती अत्त्युत्कृष्ट तंत्रज्ञान, शाश्वतता आणि उत्पादकता आणि खुशाली या दोन्हींचे संवर्धन देऊ करते. ही जागा LEED Platinum /लीड प्लॅटिनम व IGBC/आयजीबीसी चे  WELL/वेल प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सुसज्ज करण्यात आली असून ती UrbanWrk/अर्बनवर्क च्या ऊर्जा कार्यक्षमता आणि कार्यस्थळांतर्गत खुशालीस प्रोत्साहन देण्याच्या वचनबध्दतेशी सुसंगत आहे. 

UrbanWrk/ अर्बनवर्कची ही अद्ययावत जोड, त्यांच्या उत्पादकता आणि वृध्दी यांना चालना देणार्‍या अग्रणी आणि लवचिकतेने व्यवस्थापित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याच्या  उद्दिष्टास बळकटी देते. MontClaire/मॉंक्लेअर हे पुण्यात नवसंशोधनपूर्ण आणि शाश्वत कार्यालयांच्या शोधात असणार्‍या आयटी कंपन्यांसाठी एक अग्रणी गंतव्य स्थान बनण्यासाठी सज्ज आहे. 


UrbanWrk/अर्बनवर्क बद्दल


UrbanWrk/अर्बनवर्क पुणे, मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, हैद्राबाद आणि कोलकाता येथे तंत्रज्ञान-समर्थित, सोयिस्कर आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पसंतीची उच्च दर्जाची व शाश्वत रित्या निर्मित व संचलित उद्योगांद्वारे-व्यवस्थापित कार्यस्थळे देऊ करतात.   ग्राहक म्हणून Deloitte/डेलॉइट, Carrier/कॅरियर, L&T/एल ॲंड टी, BDO Rise/बीडीओ राइज, 3M/3 एम, Ather/आथेर, L&T, Schinder/एल ॲन्ड टी श्नायडर, SBI General Insurance/एसबीआय जनरल इन्श्युरन्स, ITC Infotech/आयटीसी इन्फोटेक, Capgemini/केपगामिनी, Saint Gobain/सेन्ट गोबेन, DSK Legal/डीएसके लीगल, JM Financials/जे एम फायनान्शियल्स, Nuvama Wealth/नुवामा वेल्थ व अनेक इतर अग्रणी कंपन्यांकडून UrbanWrk/अर्बनवर्क ने अग्रस्थानावरील ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून ख्याती प्राप्त केली आहे.  

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला