एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. यांच्यातर्फे पुण्यात प्रथमच मीडिया सभेचे आयोजन
एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. यांच्यातर्फे पुण्यात प्रथमच मीडिया सभेचे आयोजन
कंपनीतर्फे 27 कोटी भारतीयांसाठी 24 वर्षांची सेवा साजरी करत आहे
पुणे, १२ नोव्हेंबर २०२४ – भारतभर आरोग्य विमा सेवा प्रदान करण्याची वचनबद्धता आणि विकास यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. ने, पुण्यामध्ये प्रथमच, मिडिया सभेचे आयोजन केले होते. या क्षेत्रातील 24 वर्षांपेक्षा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या कंपनीने, देशभरात 27 कोटी (270 दशलक्ष) व्यक्तींपर्यंत यशस्वीरित्या संपर्क साधला आहे, ज्यामुळे लाखो लोकांना दर्जेदार आरोग्य विमा सेवा आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
सेवा आणि भागीदारीचा वारसा
भारतातील अग्रगण्य तृतीय-पक्ष प्रशासक (TPA) असलेल्या, MDIndia कडे, 5 लेझर फोकस्ड बिझनेस व्हर्टिकल आहेत, प्रत्येक एक उत्कृष्टतेचे केंद्र आहे आणि ते कार्यरत असलेल्या क्षेत्रांमध्ये कौशल्याचे मापदंड आहेत. ही 5 वैयक्तिक बिझनेस व्हर्टिकल म्हणजे: कॉर्पोरेट मेडिक्लेम सर्व्हिसेस व्हर्टिकल, गव्हर्नमेंट मास हेल्थ स्कीम्स व्हर्टिकल, रिटेल पॉलिसी सर्व्हिसिंग व्हर्टिकल, प्री-इन्शुरन्स मेडिकल सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट आयसी सर्व्हिसेस. या सर्व 5 अद्वितीय आणि हायपर स्पेशलाइज्ड बिझनेस व्हर्टिकलमधील बाजारातील अग्रेसर असणार्यांपैकी एमडीइंडिया एक आहे.
एक दूरदर्शी नेता: श्री ब्रिज शर्मा
कंपनीचे संस्थापक, ब्रिज शर्मा, हे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणेचे पदवीधर आहेत आणि त्यांनी येल विद्यापीठातून एमबीए केले आहे. एक दूरदर्शी उद्योजक असे शर्मा हे, भारतातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी अत्यंत समर्पित आहेत. ते तांत्रिक प्रगतीचे एक भक्कम पुरस्कर्ते असल्याने, एमडीइंडियाला, तांत्रिकदृष्ट्या उद्योगातील सर्वात कार्यक्षम कंपन्यांपैकी एक बनविण्यावर त्यांचा भर आहे. MDIndia, हेल्थकेअर क्षेत्रात आघाडीवर राहील याची सुनिश्चिती होण्यासाठी, कामकाजातील कार्यक्षमता वाढवणारी, खर्च कमी करणारी आणि शेवटी ग्राहकांचे समाधान साधारणारी, सलग पारिस्थितिक प्रणाली तयार करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे.
श्री ब्रिज शर्मा यांनी सांगितले, "MDIndia मध्ये, आम्ही प्रक्रिया सुलभ करणे, खर्च कमी करणे आणि ग्राहकांच्या समाधानातील प्रगती सुधारण्यासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करतो." "आम्ही 'सर्वांसाठी आरोग्य' या सरकारच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देताना आणि आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीतील फसवणुकीचा मुकाबला करताना, आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यक्षमता आणण्यासाठी, तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर, आम्ही विश्वास ठेवतो."
विस्तार आणि नाविन्यासाठी वचनबद्धता
आपल्या देशव्यापी कामकाजाव्यतिरिक्त, MDIndia भारतातील अधिकाधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी सतत कार्यरत असते. कंपनीने, देशभरात 109 हून अधिक कार्यालयांचे जाळे आधीच स्थापन केले आहे आणि आपल्या सेवा अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी, कंपनीने आपले क्षेत्र आणखी वाढवण्याची योजना आखली आहे.
श्री रजनीश शर्मा यांचे नेतृत्व
रजनीश शर्मा, अध्यक्ष, एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि., हे विमा उद्योगातील एक प्रतिष्ठित नाव आहे, जे भारतातील आरोग्य विमा परिसंस्था वाढविण्याकरीता, धोरणात्मक दृष्टी आणि वचनबद्धतेसाठी ओळखले जाते. शर्मा यांनी, ग्राहक सेवा सुधारण्यासाठी आणि देशभरातील दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा याकरीता तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला देऊन, कंपनीच्या वेगवान विस्ताराकरीता, यशस्वी मार्गदर्शन केले आहे.
रजनीश शर्मा म्हणाले, "MDIndia चे ध्येय स्पष्ट आहे: प्रत्येक भारतीयाला, त्याची पार्श्वभूमी काहीही असो, त्याला परवडणारी, विश्वासार्ह आणि सुलभ आरोग्यसेवा उपाय प्रदान करणे" "आम्ही सतत विकसित होत आहोत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहोत आणि एक निरोगी भारत निर्माण करण्यासाठी सरकारी उपक्रमांसोबत काम करत आहोत."
MDIndia चे व्यवस्थापकीय संचालक, समीर भोंसले, हे एक उच्च शिक्षित असून, त्यांना उद्योगातील प्रगाढ अनुभव आहे, त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे आणि लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी या अत्यंत जटिल आणि विशिष्ट क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. 3 दशकांहून अधिक अशी प्रदीर्घ कारकीर्द असलेले, ते व्यवसाय उत्कृष्टतेच्या पद्धतींचा एक मजबूत समर्थक आहेत तसेच त्यांचे लक्ष्य, ग्राहक आणि बाजार केंद्रित आहे. अनेक गोष्टी सुरू केल्याचे श्रेय त्यांच्या वाट्याला आहे.
"MDIndia मध्ये, आम्ही 100% CSAT साध्य करण्याच्या उद्देशाने लोक, प्रक्रिया आणि दर्जेदार पद्धतींच्या अद्वितीय मिश्रणासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतो आणि एक अपवादात्मक ग्राहक अनुभवाची सुनिश्चिती करण्यासाठी एकमेवाद्वितीय अशा भिन्नता निर्माण करतो आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या माध्यमातून ग्राहकांचा प्रवास असाधारण बनवतो. "
एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रा. लि. विषयीः
2000 मध्ये स्थापित, MDIndia Health Insurance TPA Pvt. Ltd. हे भारतीय आरोग्य विमा क्षेत्रातील, अग्रगण्य तृतीय-पक्ष प्रशासक (TPA) आहे. रुग्णालये, डॉक्टर्स आणि विमा पुरवठादारांच्या मजबूत नेटवर्कद्वारे, सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपाय प्रदान करण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे. MDIndia भारतातील लाखो लोकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळावा याची खात्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
Comments
Post a Comment