खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

 खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन


पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील कानाकोपऱ्यात ते पदयात्रेच्या माध्यमातून पोहचत आहेत. आज खडकी व्यापारी संघटनेची मनिष आनंद यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत खडकी मधील व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन यावेळी आनंद यांनी दिली. 


विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्यावर येत आहे, यामुळे उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असल्याचे दिसत आहे. मनिष आनंद यांनी खडकी मधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच खडकी बाजार मधील वाहतुकीचा प्रश्न आणि अन्य अडचणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आनंद यांनी यावेळी दिले.


दरम्यान, आज गुरुनानक जयंतीचा मुहूर्त साधत मनिष आनंद यांनी खडकी आणि रेंज हिल्स येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले आणि नागरिकांशी चर्चा केली. तसेच आज शुक्रवार असल्याने खडकीतील जामा मशीद मध्ये जाऊन नमाज अदा केली.


तत्पूर्वी काल सायंकाळी मनिष आनंद यांनी येरवडा येथील एका बुद्ध विहाराला भेट देत, त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज लायब्ररी उभारण्यात येईल असे सांगितले. तसेच मालमत्ता कराच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.





Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan