IDTR Pune: पुण्यातील institute of driving training मध्ये जागतिक रस्ते अपघातात प्राण गमवावे लागणार्‍या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली---

  IDTR Pune: पुण्यातील institute of driving training मध्ये जागतिक रस्ते अपघातात प्राण गमवावे लागणार्‍या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली---
 जागतिक पातळीवर नोव्हेंबर चा तिसरा रविवार रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्या साठी कार्यक्रम आयोजित केले जातात.  यावर्षी  अशा व्यक्तीचे स्मरण करा. त्याचे कुटुंबीयांना मदत करा. अपघातात जखमींना मदत करा. यापुढे  असे अपघात होणार नाही याची काळजी घ्या. अशा विचाराचा प्रचार करण्यासाठी यावर्षी जागतिक पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे Idtr तर्फे पिंपरी नर्सिंग कॉलेज आणि UNM फाऊंडेशन  याचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रथम डॉ श्रीकृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटल यांनी विद्यार्थ्यांना कोणताही अपघात झाला तर प्राथमिक उपचार बाबत गरज  आणी  पद्धती बाबत माहिती दिली. त्यानंतर virtual रिअ‍ॅलिटी पद्धतीने रूग्णांना द्यावयाचे उपचार बाबत  प्रॅक्टिस घेण्यात आली.
 कार्यक्रमांसाठी विशेष उपस्थित पिंपळे नीलख मधील हालके वाहनाच्या गॅरेज मालक विशाल जाधव यानी रस्ते अपघात परिणाम  भोगलेल्या कुटुंबीयांच्या यातना भावना व्यक्त केल्या.
 उष्माघात झाले मुळे acceletar वरील  हातावर नियंत्रण न राहिले  मुळे  वेग वाढला आणि मोटरसायकल वरुन त्याचा भाऊ Ashay  रस्तावर आदळला. लोकानी त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
मे 22 मध्ये मोटरसायकल हेल्मेट नसताना चालवीत असताना उष्माघात झाले मुळे acceletar वरील  हातावर नियंत्रण न राहिले  मुळे  वेग वाढला आणि मोटरसायकल वरुन त्याचा भाऊ Ashay  रस्तावर आदळला. लोकानी त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. ashay
 आश्रय याला फिट येत असत. Ashay बेशुद्ध होता  बाहेरून कोणतीही जखम दिसून yet नव्हती. स्थानिक रुग्णालयात उपचाराने फरक पडत नव्हता म्हणून उच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेड स्कॅनर नंतर  डोक्यात तीन ठिकाणी मेंदूच्या हाडांना तडे गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे डोक्यात सुज ,ऑपरेशन, आय सि यू ,वॉर्ड  ,मेडिसिन अशा चक्रातून   तीन महिने झाले. त्यानंतर नॉर्मल    शुश्रूषा रुग्णालयात नऊ महिने नंतर घरी शुश्रूषा. नळाद्वारे अन्न, बेड सौर, आई वडील याच्याकडून रुग्णसेवा.
 ऑक्सिजन, सलाईन, फिजिओथेरपी  नर्सिंग शिकलेली पोस्ट ग्रॅज्युएट भगिनी ,अधून मधून हॉस्पिटल वारी असे सेवेत असूनही  अशय ashay याने दोन वर्षानी  जगाचा निरोप घेतला असे सांगून विशाल यांनी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले असताना वाहन चालवा. हेल्मेट सीट बेल्ट चा वापर करा. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीना मदत करा. असे अपील त्यांनी केले.
नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांना पुढील जीवनात समाजास अशा वेळी मदत करण्यासाठी जनमत तयार  करण्यासाठी  हे  उपक्रम दिशादर्शक ठरेल अशी आशा संजय ससाणे यांनी व्यक्त केली. विशाल यांनीभावना अश्रू नेत्रांनी व्यक्त केल्या.  रस्ते अपघातात प्राण गमवावे लागणार्‍या व्यक्तिंना श्रद्धांजली वाहिली  .डॉ निर्मल कुमार राक्षे याचे UnM फाऊंडेशन तर्फे Virtual पद्धतीने फर्स्ट respondant साठी प्राथमिक उपचार प्रशिक्षण IDTR मध्ये देणाऱ्या प्रशिक्षक याचा सत्कार करण्यात आला. नर्सिंग व्यवसाय निवडून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना बाबत  चित्रं प्रदर्शन आयोजित केले  होते.  चहापाणी नंतर कार्यक्रम संपला.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला