यूग्रो कॅपिटलच्या अभिनव क्रेडिट स्कोअरिंग मॉडेल 'GRO Score' ला पेटंट प्राप्त – क्रेडिट प्रवेशामधील अडथळे दूर करणारे क्रांतिकारी मॉडेल

 यूग्रो कॅपिटलच्या अभिनव क्रेडिट स्कोअरिंग मॉडेल 'GRO Score' ला पेटंट प्राप्त – क्रेडिट प्रवेशामधील अडथळे दूर करणारे क्रांतिकारी मॉडेल

पुणे :


यूग्रो कॅपिटल, जी एमएसएमई कर्जपुरवठ्यावर केंद्रित असलेली एक आघाडीची डाटा-टेक एनबीएफसी (NBFC) आहे, तिने आपले पेटंट मिळवून एक मोठे यश मिळवले आहे. या पेटंटचे नाव ‘मॉडेलिंग क्रेडिट स्कोअरकार्डसाठी लागणारी पद्धत आणि प्रणाली’ असे आहे. हे पेटंट एमएसएमई कर्जदारांसाठी क्रेडिट मूल्यमापनाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करते.

एमएसएमई भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास एक-तृतीयांश योगदान देतात, पण तरीही पारंपरिक कर्जदात्यांनी गहाणखत आणि उत्पन्न-आधारित मूल्यमापनावर अवलंबून राहिल्यामुळे त्यांना क्रेडिट मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यूग्रो कॅपिटलने हा प्रश्न 'GRO Score' या अत्याधुनिक क्रेडिट मूल्यमापन मॉडेलच्या माध्यमातून सोडवला आहे, जो तुम्हाला मिळणारे उत्पन्न कागदपत्रांशिवाय कर्जदारांचे सखोल मूल्यमापन करण्यासाठी पेमेंट हिस्टोरी, बँक व्यवहार आणि जीएसटी अहवाल यांसारख्या डेटाचा उपयोग करतो.

आता 'GRO Score 3.0' च्या तिसऱ्या आवृत्तीत, प्रगत सांख्यिकी अल्गोरिदमचा वापर करून कर्जदारांच्या क्रेडिट वर्थीनेसचे अत्यंत अचूक मूल्यमापन केले जाते. आतापर्यंत, या मॉडेलने 1.7 लाखांहून अधिक कर्ज अर्जांचे मूल्यांकन केले असून 5.6 लाख बॅंकिंग व्यवहार, 2.3 लाख बँक स्टेटमेंट्स आणि 80,000 जीएसटी अहवालांचे विश्लेषण केले आहे. यामुळे भारतभरातील एमएसएमईंना महत्त्वपूर्ण भांडवल उपलब्ध करून दिले गेले आहे.

यूग्रो कॅपिटलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ यांनी याच महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “आमचे 'GRO Score' पेटंट MSME कर्जामध्ये परिवर्तन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. एमएसएमई कर्जदारांच्या अनोख्या अडचणींनुसार सूक्ष्म जोखीम मूल्यमापन करून आम्ही या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये वाढीची आणि लवचिकतेची संधी निर्माण करत आहोत. हे यश आम्हाला क्रेडिट मूल्यमापनामध्ये नवकल्पना सुरू ठेवण्यास आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत एमएसएमईंना सेवा देण्यास प्रेरणा देते.”

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला