मुलांमधील लठ्ठपणावर मात करण्यासाठी औंधमध्ये अंकुरा हॉस्पिटलची ओपीडी सुविधा
मुलांमधील लठ्ठपणावर मात करण्यासाठी औंधमध्ये अंकुरा हॉस्पिटलची ओपीडी सुविधा
आहार व व्यायामाविषयी मार्गदर्शन, वैयक्तिक सल्ला आणि अचुक निदान यासारख्या सेवांचा घेता येणार लाभ
पुणे: लठ्ठपणा हा आजार केवळ तरुण आणि प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढू लागला आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे बालपणातील लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच लहान मुलांमधील लठ्ठपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी अंकुरा हॉस्पिटलने पुण्यातील औंध येथे त्यांचे पहिले पेडिएट्रीक ओबेसिटी क्लिनिक सुरू केले आहे.
जागतिक स्तरावर लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असून यामुळे मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, सांध्या संबंधी समस्या, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि आत्मविश्वास कमी होण्यासारख्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. लठ्ठपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष क्लिनिकची वाढती गरज लक्षात घेता अंकुरा हॉस्पिटलने विशेष ओपीडी सुविधा सुरु केली.
डॉ. सीमा जोशी(वरिष्ठ बालरोगतज्ञ आणि किशोरवयीन समुपदेशक) सांगतात की, हा उपक्रम वैयक्तीक उपचार योजना, मानसिक आधार आणि जीवनशैलीसंबंघीत विशेष सल्ला मिळवून देईल. आम्ही लठ्ठपणाचा उच्च धोका असलेल्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना यामाध्यमातून सेवा उपलब्ध होईल.
हे क्लिनिक सुरु करण्यामागचे आमचे ध्येय म्हणजे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत रोखणे व योग्य उपचार व व्यवस्थापन करणे
· संपुर्ण काळजी - केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर भावनिक आणि सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करणे.
· प्रतिबंध आणि शिक्षण - हे निरोगी सवयी शिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल. कुटुंबियांना कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी साक्षर करणे
· सर्वसमावेशक दृष्टिकोन - जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही बालरोगतज्ञ, एंडोक्राइनोलॉजिस्ट, व्यायामातील तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ अशा टीमला सहभागी करुन घेऊ.
· कुटुंब-केंद्रित दृष्टिकोन- अधिक प्रभावी आणि अचुक परिणामांसाठी उपचार प्रक्रियेत संपूर्ण कुटुंबाला सहभागी केले जाईल.
· सहाय्यक वातावरण- आम्ही प्रोत्साहन देत पोषक वातावरण तयार करू, जेणेकरून मुले आणि कुटुंबियांना समजून घेता येईल.
डॉ. कोचुरानी अब्राहम(पेडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजिस्ट) सांगतात की, भारतात बालपणातील लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक दराने वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि बैठी जीवनशैली अशा घटकांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढते आहे. जास्त वजन वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे आणि अकाली सांधेदुखी किंवा हाडांच्या वेदना आढळून येणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात. उपचार न केल्यास बालपणातील लठ्ठपणामुळे भविष्यात मधुमेह, हृदयरोग आणि मानसिक आजारांसारख्या गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.
मुलांना लठ्ठपणाशी लढण्यास आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करण्यासाठी, अंकुरा हॉस्पिटलने लठ्ठपणावर मात करण्यासाठी विशेष ओपीडी सुरू करून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
डॉ. सीमा जोशी यांनी मुलांमधील लठ्ठपणाशी संबंधित दीर्घकालीन जोखमींवर प्रकाश टाकला. ओपीडीमध्ये मला भेटायला येणाऱ्या ५ ते १९ वयोगटातील १० पैकी ३ मुले आता लठ्ठपणासारख्या आजाराचा सामना करत आहेत.
मुलांमध्ये लठ्ठपणा हा केवळ वजन वाढण्याशी संबंधित नाही तर त्यामुळे टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अगदी स्लीप एपनिया यासारख्या अनेक आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होतात. लठ्ठपणा मुलाच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतात. यासाठी वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जर त्यावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर ते त्यांच्या वाढीवर आणि एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
डॉ. सीमा जोशी पुढे सांगतात की, दर महिन्याला, मला व्यायामाच्या अभावामुळे आणि जंक फूडच्या सेवनामुळे जास्त वजन किंवा लठ्ठपणाची समस्या असलेली किमान १५-२० मुले भेटीसाठी येतात. आम्ही आमच्या आहारतज्ज्ञ अंजली शिंदे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना योग्य आहार योजना, शारीरिक क्रियांविषयी मार्गदर्शन, वर्तणुकीबाबत सल्ला आणि सर्वसमावेशक काळजी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक निदान सेवा प्रदान करतो.
बालरोग लठ्ठपणा सारख्या आजारावर मात करत उत्कृष्ट उपचार प्रदान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. येथे प्रत्येक मुलाला वजन नियंत्रणात राखण्यासाठी आणि निरोगी सवयी विकसित करण्याची आणि शारीरिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रत्येक स्तरावर संधी दिली जाईल. भविष्यात एक निरोगी पिढी तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
Comments
Post a Comment