विद्यार्थ्यांसाठी साई बिझनेस क्लब तर्फे व्यवसायिक ज्ञान संमेलन

*विद्यार्थ्यांसाठी साई बिझनेस क्लब तर्फे व्यवसायिक ज्ञान संमेलन*

*देशाला आर्थिक महासत्ता करायचे असेल तर युवकांनी नोकरी देणारे व्हा!* 
पुणे: युवकांचा देश म्हणून ख्याती असलेल्या भारत देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर याच युवकांनी आता नोकरी घेणारे नसून नोकरी देणारे होण्याची गरज आहे. व्यवसाय करायला एक चांगली आयडिया तुमच्याकडे असेल आणि मार्केटचा थोडा अभ्यास केला तर तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. असे मत साई बिझनेस क्लब आयोजित विद्यार्थी व्यवसायिक ज्ञान संमेलना प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. 
महाविद्यालयीन विद्यार्थांना व्यवसायिक मार्गदर्शक मिळावे यासाठी साई बिझनेस क्लब द्वारे व्यवसायिक ज्ञान संमेलन चे आयोजन गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी घोले रोड, शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये जे.एस.पी.एम युनिव्हर्सिटी पुणे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज आणि अकेमी गृप ऑफ इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते. साई बिझनेस क्लबच्या संचालिका प्रो. डॉ. कृती वजीर यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले.

कार्यक्रमा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात 'उद्याच्या घडीला सामाजिक उद्योजकांची भूमिका काय असेल' यावर डॉ. कीर्ती लोणगाणी व डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी आपली मते व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. खुशाली ओझा यांनी या सत्राचे संचालन केले होते. डॉ. कीर्ती शाह यांनी 'मेमरी फोकस' वर लाइव्ह सेशन घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती आणली. 'ब्रँड तयार करणे आणि विक्री वाढवणे' या विषयावर प्रसाद गणपुले यांनी विचार मांडून डॉ विद्या नागरे यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुसऱ्या चर्चासत्रात डॉ. सुहास जातेगावकर व डॉ. कृती वाजिर यांनी नवीन स्टार्टप्स मधील चॅलेंजेस या विषयावर प्रकाश टाकला. याचे होस्टिंग डॉ. प्रभा सिंग यांनी केले होते. 

कार्यक्रमाची सांगता करताना तुमच्या 'श्री आरोग्यम'च्या नवीन प्रॉडक्टचे लॉन्चिंग आयकर विभाग आयुक्त अजय केशरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री आरोग्यम चे संचालक सोहम पवार सहपरिवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल सिसोदिया आणि नादर कनन यांनी तर आभार प्रोफेसर डॉ. कृती वजीर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला