फोर्स मोटर्स लिमिटेड भारतीय संरक्षण दलांना २,९०० हून अधिक फोर्स गुरखा वेईकल्‍सचा पुरवठा करणार

 फोर्स मोटर्स लिमिटेड भारतीय संरक्षण दलांना २,९०० हून अधिक फोर्स गुरखा वेईकल्‍सचा पुरवठा करणार



पुणे, २७ मार्च २०२५ - फोर्स मोटर्स लिमिटेड या शक्तिशाली व विश्‍वसनीय वेईकल्‍सच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतीय संरक्षण दलांकडून २,९७८ वेईकल्‍सची महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाल्‍याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण ऑर्डरमधून फोर्स मोटर्सची आपल्‍या जनरल सर्विस वेईकल्‍सच्‍या प्रबळ श्रेणीच्‍या माध्‍यमातून भारताच्‍या संरक्षण क्षमतांना पाठिंबा देण्‍याप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते. हा सहयोग कंपनीसाठी अभिमानास्‍पद आहे, ज्यामधून भारतीय संरक्षण क्षेत्रासोबतचा दीर्घकाळापासूनचा सहयोग अधिक दृढ होतो.  

ही वेईकल्‍स भारतीय लष्‍कर व भारतीय हवाई दलाच्‍या विविध ऑपरेशनल गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत, ज्‍यामधून मागणदायी संरक्षण वातावरणांमध्‍ये उत्तम कामगिरी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येणारी मिशन-सुसज्‍ज वेईकल्‍स वितरित करण्‍याप्रती फोर्स मोटर्सची क्षमता दिसून येते.

फोर्स मोटर्स अनेक वर्षांपासून आपल्‍या गुरखा एलएसव्ही (लाईट स्ट्राइक व्हेईकल)द्वारे संरक्षण क्षेत्राला सेवा देत आहे, जेथे ही वेईकल टिकाऊपणा, ऑफ-रोड क्षमता आणि अनुकूलतेसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः फोर्स गुरखा ही अत्यंत आव्‍हानात्‍मक वातावरणात उत्कृष्‍ट कामगिरी करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, जी अद्वितीय कार्यक्षमता, उच्‍च दर्जाचे ग्राउंड क्लीयरन्स, तिच्‍या वर्गातील सर्वोच्‍च वॉटर वेडिंग क्षमता आणि अपवादात्मक मॅन्युव्हरेबिलिटी देते. या वेईकलची मजबूत रचना, विश्‍वासार्ह ड्राइव्हट्रेन आणि प्रगत ४x४ क्षमता वेईकलला सशस्‍त्रदलांसाठी आदर्श पर्याय बनवतात, ज्‍यामधून वाळवंटांपासून पर्वतीय प्रदेशांपर्यंतच्‍या विविध भूप्रदेशांमध्ये मोहिमेसाठी सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते.

“आम्हाला या मोठ्या ऑर्डरच्‍या माध्‍यमातून भारतीय संरक्षण दलांसोबतचा आमचा सहयोग सुरू ठेवण्‍याचे सन्‍माननीय वाटत आहे,'' असे फोर्स मोटर्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्‍हणाले, “आमची वेईकल्‍स दर्जा, विश्‍वसनीयता, प्रबळता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत डिझाइन करण्‍यात आली आहेत, जी आपल्‍या संरक्षण कर्मचाऱ्यांच्‍या ऑपरेशनल गरजांची पूर्तता करतात. या ऑर्डरमधून भारतीय संरक्षण दलांचा फोर्स मोटर्सवरील विश्‍वास आणि आत्‍मविश्‍वास दिसून येतो.''

फोर्स मोटर्स संरक्षण क्षेत्रासाठी आपल्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ करण्‍याप्रती समर्पित आहे, जेथे सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सतत नाविन्‍यता आणत आहे. ही ऑर्डर भारताच्‍या संरक्षण पायाभूत सुविधेसाठी प्रमुख सहयोगी म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ करते, तसेच राष्‍ट्रीय सुरक्षिततेप्रती कंपनीच्‍या अविरत कटिबद्धतेला देखील सादर करते.

फोर्स मोटर्स लिमिटेड: भारतातील आघाडीची व्‍हॅन मेकर

श्री. एन. के. फिरोदिया यांनी १९५८ मध्‍ये जनतेला किफायतशीर, विश्‍वसनीय आणि कार्यक्षम परिवहन देण्‍याच्‍या दृष्टिकोनासह फोर्स मोटर्स लिमिटेडची स्‍थापना केली. आज, ही पूर्णत: एकीकृत ऑटोमोबाइल कंपनी म्‍हणून ओळखली जाते, जी वेईकल्‍स, अॅग्रीगेट्स व कम्‍पोनण्‍ट्सची रचना, विकास आणि उत्‍पादन करण्‍यामध्‍ये विशेषीकृत आहे.

कंपनी भारतभरातील पाच अत्‍याधुनिक उत्‍पादन युनिट्सचे कार्यसंचालन पाहते, तसेच १०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे आणि डॉ. अभय फिरोदिया कंपनीचे नेतृत्‍व करत आहेत. कंपनीचे पुण्‍यातील १,००० हून अधिक तज्ञांच्‍या डिझाइन टीमचे पाठबळ असलेले प्रगत आरअँडडी सेंटर देशातील सर्वोत्तम केंद्र म्‍हणून मान्‍यताकृत आहे.

फोर्स मोटर्स वैविध्‍यपूर्ण ऑटोमोटिव्‍ह कंपनी आहे, जी सानुकूल, देश-संबंधित सोल्‍यूशन्‍स देत विविध आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये सक्षम आहे. कंपनीच्‍या व्‍यापक उत्‍पादन श्रेणीमध्‍ये लाइट कमर्शियल वेईकल्‍स व मल्‍टी-युटिलिटी वेईकल्‍सचा समावेश आहे आणि कंपनी मध्‍य पूर्व व गल्‍फ प्रांत, आशिया, लॅटिन अमेरिका व आफ्रिकेपर्यंत निर्यात करते.

फोर्स मोटर्सने सतत उच्‍च दर्जाचे इंजिन्‍स व कम्‍पोनण्‍ट्स वितरित करत जागतिक ऑटोमोटिव्‍ह लीडर्ससोबत प्रबळ संबंध निर्माण केले आहेत.

मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्‍ल्‍यू यांनी फोर्स मोटर्सला भारतात उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या सर्व कार्स व एसयूव्‍हींसाठी इंजिन्‍सची निर्मिती आणि चाचणी करण्‍याची जबाबदारी दिली. भारतात उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक मर्सिडीज-बेंझ वेईकलमध्‍ये चाकण, पुणे येथील फोर्स मोटर्समध्‍ये उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या इंजिनची शक्‍ती आहे.

तसेच, फोर्स मोटर्सची चेन्‍नईमधील जागतिक दर्जाची फॅक्‍टरी बीएमडब्‍ल्‍यूच्‍या काटेकोर मापदंडांप्रमाणे निर्माण करण्‍यात आली आहे, जी देशामध्‍ये उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक बीएमडब्‍ल्‍यू कार व एसयूव्‍हीला शक्‍ती देते.

फोर्स एमटीयू पॉवर सिस्‍टम्‍स प्रा. लि. फोर्स मोटर्स आणि रोल्‍स-रॉईस पॉवर सिस्‍टम्‍स एजी यांच्‍यामधील संयुक्‍त उद्यम आहे. हा उद्यम चाकण, पुणे येथील त्‍यांच्‍या उत्‍पादन केंद्रामध्‍ये ५४५ एचपी ते १०५० एचपीपर्यंतचे १० व १२-सिलिंडर सिरीज १६०० इंजिन्‍स उत्‍पादित करण्‍यामध्‍ये विशषीकृत आहे. जागतिक स्‍तरावर वीज निर्मिती आणि अंडरफ्लोअर रेल उपयोजनांसाठी या इंजिन्‍सचा पुरवठा केला जातो.

उत्‍पादने आणि नाविन्‍यता

फोर्स मोटर्स प्रवासी व सामान वाहतू


कीसाठी सोल्‍यूशन्‍स देते, जेथे त्‍यांच्‍या ट्रॅव्‍हलर व ट्रॅक्‍स श्रेणी त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत. ट्रॅव्‍हलर कार्यक्षमता व विश्‍वसनीयतेमधील बेंचमार्कसह अग्रस्‍थानी आहे, तर प्रबळ ट्रॅक्‍स खडतर प्रदेशांमधील गरजांची पूर्तता करते.

फोर्स मोटर्सने नवीन ग्राऊंड-अप मॉड्युलर मोनोकॉक पॅसेंजर व्‍हॅन प्‍लॅटफॉर्म अर्बेनिया लाँच केला आहे, ज्‍यास देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांसाठी प्रीमियम शेअर्ड मोबिलिटी विभागाला सुरूवात केली आहे. भारतात प्रबळ उपस्थिती स्‍थापित केल्‍यानंतर अर्बेनिया आता जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्‍ये विस्‍तारित होत आहे.

फोर्स ट्रॅव्‍हलर मोनोबस कार्यक्षम मध्‍यम आकाराची बस आहे, जी सुरक्षित व विश्‍वसनीय प्रवासी वाहतूकीसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या बसची मोनोकॉक रचना स्थिरता, आरामदायीपणा व इंधन कार्यक्षमता वाढवते, ज्‍यामुळे ही बस परिवहनासाठी पसंतीची निवड आहे.  

३-डोअर व ५-डोअर व्‍हेरिएण्‍ट्समधील फोर्स गुरखा तिच्‍या प्रबळ रचना आणि ऑफ-रोड क्षमतांसाठी ओळखली जाते. ही वेईकल खडतर प्रदेशांमध्‍ये सहजपणे प्रवास करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. तसेच साहसी प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही वेईकल टिकाऊपणा, क्षमता आणि अद्वितीयता सर्व प्रदेशांमधील कार्यक्षमतेची खात्री देते.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा