मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या श्रींची भव्य आगमन मिरवणूक २७ ऑगस्टला
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या श्रींची भव्य आगमन मिरवणूक २७ ऑगस्टला
पुणे : पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या यावर्षी श्रींची आगमन मिरवणूक दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 8 वा. उत्सव मंडपातून भव्य उत्साहात पार पडणार आहे. श्रींची मूर्ती मूर्तिकार श्री अभिजीत धोंडफळे यांच्या रास्ता पेठ, पॉवर हाऊस जवळील निवासस्थानापासून निघून अपोलो सिनेमा, दारूवाला पूल, फडके हौद मार्गे गणेश रस्ता मार्गे उत्सव मंडपात आगमन करेल.
या भव्य मिरवणुकीत संघर्ष ढोल पथक, श्रीराम ढोल पथक, अभेद्य ढोल पथक आणि प्रभात बँड सहभागी होऊन वादनाचा नाद घुमवतील. तसेच देवळणकर बंधूंचे नगारा वादन मिरवणुकीला पारंपरिक रंगत आणणार आहे.
🔸 श्रींची प्राणप्रतिष्ठापना
श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11:37 वा. पुण्यातील नामवंत आध्यात्मिक गुरु व लेखक स्वामी सवितानंद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडेल.
स्वामी सवितानंद महाराज हे स्तोत्र व मंत्रांमधील विज्ञान तसेच हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर गाढा अभ्यास करणारे, प्रभावी प्रवचनकार आहेत. उच्चशिक्षित असलेले स्वामीजी यांनी संन्यास घेण्यापूर्वी टाटा कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कार्य केले. संन्यासानंतर त्यांनी सुरत जिल्ह्यातील तरसाड येथे आश्रम स्थापन केला असून महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे.
🌺 पुणेकरांच्या उपस्थितीत यंदाची आगमन मिरवणूक आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा भव्यतेने साजरा होणार आहे.
-
Comments
Post a Comment