नवरात्रीच्या निमित्ताने* *6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत*
*नवरात्रीच्या निमित्ताने*
*6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत*
पुणे : शारदीय नवरात्र उत्सवामध्ये
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत शहराच्या विविध भागातील 6785 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.
ट्रस्टच्या वतीने अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव (शिंदे पार), महालक्ष्मी मंदिर (सारसबाग), अहिल्यादेवी तरुण मंडळ नवरात्र उत्सव, वनराज मंडळ नवरात्र उत्सव, श्री चतुःश्रृंगी देवी परिसर आणि दावडी गाव (आळंदी) या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, दंत स्कॅन तपासण्या करण्यात आल्या. शिवाय बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) असणाऱ्या तपासण्या करून औषधे देण्यात आली. चष्म्यांचेही वाटप करण्यात आले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
विजयादशमीपर्यंत शहरातील अन्य ठिकाणीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. ट्रस्टच्या या उपक्रमासाठी सिल्व्हर बर्च हॉस्पिटल, रेणूका नेत्रालय, तेजोमय केअर सेंटर, पटवर्धन क्लिनिक, मेडियुष डेंटल सेंटर या संस्था आणि रुग्णालयांचे सहकार्य मिळाले आहे.
Comments
Post a Comment