ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

*ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा*
पुणे: ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स तर्फे शिक्षक दिन मा. चेअरमन श्री. सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विभाग प्रमुख व प्राचार्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे महत्त्व या विषयावरील भाषणाने झाली. त्यानंतर मनमोहक वाद्यवृंद, सामूहिक गान व नृत्य सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेल्या विशेष शीर्षकांमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते अतूट असावे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक बांधील राहिले पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनीही पालक व शिक्षकांचा सन्मान राखून आदर्श वर्तन ठेवावे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या आरंभ गटाचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर