रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य, शिवसेना प्रणित म्हणून मान्यता पत्र शिवसेना महाराष्ट्र राज्याचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांना प्रधान,



रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य, शिवसेना प्रणित म्हणून मान्यता पत्र शिवसेना महाराष्ट्र राज्याचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांना प्रधान,



वंदनीय हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपल्या रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची शिवसेना प्रणित म्हणून मुंबई येथे शिवसेना भवानामध्ये मान्यता देण्यात आली आहे सदर मान्यता पत्र शिवसेना महाराष्ट्र राज्याचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांना देण्यात आले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे पक्षाची प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे असे मत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केले, यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे सुनील गायकवाड, विजय वरछाये, सुनील राठी, उमेश चराटे, सुनील चराटे, रोहिदास थोरात, संजय शेकावकर, गंगोत्री साळुंखे, किशोर डोंगरे आदि यावेळी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर