स्व हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की ज्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येईल त्या दिवशी दुसरी कोणतीही शक्ती दिसणार नाही, ( गृहमंत्री योगेश कदम)


 
स्व हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की ज्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येईल त्या दिवशी दुसरी कोणतीही शक्ती दिसणार नाही, ( गृहमंत्री योगेश कदम)

रिपब्लिकन सेना व शिवसेना यांचा संवाद मेळावा पुणे कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला यावेळी गृहमंत्री योगेश कदम म्हणाले वंदनीय स्व हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितले होते की ज्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येईल त्या दिवशी दुसरी कोणतीही शक्ती दिसणार नाही, तसेच पुढे म्हणाले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच मुळगाव आंबडवे माझ्या मतदारसंघात आहे आणि तिथेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविस्मरणीय स्मारक उभ होते याचा मला अभिमान आहे, तसेच महामाता रमाई यांचे गाव वणंद देखील माझ्या मतदारसंघात आहे आणि तिथे सुद्धा माता रमाई यांचं भव्य स्मारक होण्याची तरतूद करत आहे, समाजकारण करत असताना माझ्या खात्यासंबंधीत मला कधीही हाक मारा मी माझ्या खात्यासंबंधी सगळी यंत्रणा तुमच्या मदतीसाठी उभे करेल असा विश्वास देतो असे कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख युवराज बनसोडे रिपब्लिकन सेना पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल शिवसेना महानगर प्रमुख माजी आमदार रविंद्र धंगेकर, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय देखणे, कामगार सेनेचे सरचिटणीस सुहास बनसोडे, रिपब्लिकन सेना पुणे शहर महिला प्रमुख स्नेहलता गायकवाड, रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहर अध्यक्ष मिलिंद सरवदे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, रिपब्लिकन सेना युवा अध्यक्ष अजय भालशंकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आशिष गाडे, अरविंद पांडेय, विशाल मस्के, विद्यार्थी सेना पुणे शहर प्रमुख हंसराज खुणे, शिवसेना पुणे शहर सह संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, किरण साळी, संदीप शिंदे, अनिल खलसे, संतोष साखरे, दत्ता शेंडगे, सतीश साबळे, आदि यावेळी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर