कोमल सिन्हा बहीरट ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५
कोमल सिन्हा बहीरट ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५
युनिव्हर्सल वुमन २०२६ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार पहिली भारतीय महिला
गोवा, २० सप्टेंबर : गोव्यात झालेल्या झगमगाटी ग्रँड फिनालेत कोमल सिन्हा बहीरट यांना मिसेस इंडिया युनिव्हर्सल वुमन २०२५ या किताबाने सन्मानित करण्यात आले. यासह भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण निर्माण झाला आहे.
संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत ग्रूमिंग सेशन्स, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आणि मुलाखतींच्या फेऱ्या पार पडल्या. या सर्व टप्प्यांत कोमलने आपल्या आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकतेने परीक्षकांची मने जिंकली. अंतिम सोहळ्यात प्रश्नोत्तर फेरीतील तिच्या मनस्पर्शी उत्तरामुळे प्रेक्षक व परीक्षक दोघेही प्रभावित झाले आणि तिच्या डोक्यावर मुकुट आला.
कोमलला हा मान मिसेस युनिव्हर्सल वुमन २०२४ विजेत्या इव्हाना कॅरोलिना यांच्या हस्ते मिळाला. यावेळी युनिव्हर्सल वुमन इंटरनॅशनल संचालिका कॅरोलिनाही उपस्थित होत्या. या विजयानंतर कोमल युनिव्हर्सल वुमन २०२६ या जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार असून, हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ही मिसेस इंडिया INC ची सलग सहावी यशस्वी सिझन होती. संस्थापक मोहिनी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम देशातील विवाहित महिलांसाठी सर्वात विश्वासार्ह मंच म्हणून ओळखला जातो. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे भारतीय महिलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुकुट मिळवून देण्यात यश आलं आहे.
कोमलने याआधी APA Miss India 2017 तसेच Supermodel International 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून, आता ती युनिव्हर्सल वुमन २०२६ मध्ये अधिक उजळून दिसणार आहे.
पटना बिहार मध्ये जन्मलेल्या कोमल सध्या पुण्यात पती साहिल भानुदास बहीरट आणि बहीरट कुटुंबासोबत राहते. तिचं लग्न दोन वेगवेगळ्या राज्यं आणि संस्कृतींचा सुंदर संगम ठरलं आहे. पेजंटबाहेर ती एक यशस्वी उद्योजिका असून व्यावसायिक जीवन आणि स्पर्धांबद्दलची आवड यांचा समतोल ती उत्तम प्रकारे साधते.
मुकुटासह कोमल मानसिक आरोग्यासाठी काम करण्याचा संकल्पही करत आहे. मानसिक अडचणींशी झुंजणाऱ्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे, संवाद आणि उपचारासाठी संधी उपलब्ध करून देणे हे तिच्या कार्याचं केंद्रबिंदू असेल. तिचा विजय हा केवळ वैयक्तिक नाही तर इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Comments
Post a Comment