"संकटातून सुटका – महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत : शिवसेना भवनात साकारला अनोखा देखावा"

 "संकटातून सुटका – महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत : शिवसेना भवनात साकारला अनोखा देखावा"



पुणे,- पुण्यातील शिवसेना भवन, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुणे येथे यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक अनोखा, प्रेरणादायी व अंगावर रोमांच उभे करणारा देखावा साकारण्यात आला आहे. “संकटातून सुटका – महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत” या शीर्षकाचा हा देखावा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित असून, त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचे आणि महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी तत्कालीन केलेल्या प्रयत्नांचे वास्तव दर्शन घडवतो.



पहलगाम येथील या दहशतवादी घटनेत पुण्यातील दोन पर्यटकांनी दुर्दैवाने आपले प्राण गमावले होते, तर शेकडो पर्यटक निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये अडकले होते. अशा बिकट प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः संकटस्थळी धाव घेत, थेट पहलगाम येथे जाऊन युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली आणि अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली.

त्या घटनेतून महाराष्ट्राला हा स्पष्ट संदेश मिळाला की नागरिक कोणत्याही संकटात सापडले तरी एकनाथ शिंदे हे नेहमीच संकटमोचक देवदूताप्रमाणे मदतीला धावून येतात.




या अनोख्या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, संपूर्ण प्रसंगाचे हुबेहूब चित्रण, सुबक कलाकृती आणि तितक्याच देखण्या सजावटींमुळे वातावरण भारावून गेले आहे.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी सांगितले की,

“शिवसेना भवनात सातत्याने वास्तवदर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी देखावे उभारण्याची परंपरा आहे. यापूर्वी ‘इरसाळवाडीचा विघ्नहर्ता’ व ‘पुणेकरांचा पाठीराखा’ या देखाव्यांनी पुणेकरांना भावनिक स्पर्श केला होता. यंदा मात्र पहलगाम येथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना वाचवण्यासाठी धाडसाने पुढाकार घेणारे खरे देवदूत म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा पराक्रम उलगडणारा हा देखावा साकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना संकट काळात दिलासा देणारे, धैर्याने मार्ग काढणारे ते खरे संकटमोचक आहेत.”


यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी देखील या देखाव्याला विशेष भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाने साकारलेल्या या संकल्पनेचे आणि कलाकृतींचे मनापासून कौतुक केले,शिवसेना भवनातील हा देखावा केवळ कलात्मकतेचा नमुना नसून, महाराष्ट्राच्या संकटकाळातील नेतृत्व, धैर्य आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी यांचे जिवंत स्मरण आहे. पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरणारा हा देखावा गणेशोत्सवात खास आकर्षणाचा विषय ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर