अभियंता दिन साजरा करताना IDTR मध्ये दुहेरी प्रशिक्षणाचा शुभारंभ”

अभियंता दिन साजरा करताना IDTR मध्ये दुहेरी प्रशिक्षणाचा शुभारंभ”

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२५:
अभियंता दिनाच्या प्रित्यर्थ इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), पुणे येथे आज दोन विशेष प्रशिक्षण बॅचेसना सुरुवात झाली.
मोटार वाहन विभागाच्या चालकांसाठी ७ दिवसीय निवासी प्रशिक्षणाची सातव्या बॅच आज प्रारंभ झाला. त्याचबरोबर, ‘प्रोजेक्ट सारथी’ या उपक्रमाच्या दुसऱ्या बॅचचाही शुभारंभ आजच झाला. या दोन्ही बॅचेसच्या प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता.
सर्व सहभागींना IDTR संस्थेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या प्रशिक्षणात समाविष्ट होणाऱ्या विषयांचे सादरीकरण दृश्यफितीद्वारे करण्यात आले.
अभियंता दिनाचे महत्त्व IDTR चे प्राध्यापक श्री. संजय ससाणे यांनी उपस्थितांना सांगितले.
भारतीय अभियंता दिन दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. ते एक प्रख्यात अभियंता व मुत्सद्दी होते. सिंचन, धरणे, जलव्यवस्थापन व पायाभूत सुविधा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची आठवण केली जाते. देशाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने साजरा केला जातो.
आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंद मेस्राम (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी), श्री. संतोष माने (झोनल मॅनेजर, PMPML) आणि श्री. विनायक जाधव (अधीक्षक,वडगाव न्यायालय) यांच्यासह संस्थेचे प्रशिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*