सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे एनआयआरएफ NIRF रँकिंग २०२५ - स्किल विद्यापीठांमध्ये प्रथम तर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौरने देखील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे एनआयआरएफ NIRF रँकिंग २०२५ - स्किल विद्यापीठांमध्ये प्रथम तर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौरने देखील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले
या यशाबद्दल समाजातील अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
पुणे, १४ सप्टेंबर २०२५: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ मध्ये पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणेने पहिले स्थान तर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौरने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले.
भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते डॉ. स्वाती मुजुमदार, प्र- कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे घेण्यात आला. दहाव्या आवृत्तीचे एनआयआरएफ (NIRF) रँकिंग या वेळी जाहीर करण्यात आले.
या यशाबद्दल समाजातील अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या करीत आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालक, प्रो चांसलर, सिंबायोसिस इंटरनॅशनल, डॉ. राजीव येरवडेकर, प्रोव्होस्ट आणि डीन, वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान संकाय हे उपस्थित होते.
या मिळालेल्या यशा बद्दल इंडस्ट्री, सस्टेक होल्डर, शिक्षक यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इंडस्ट्री पाटनर्स - लेफ्टनंट जनरल धीरज सेठ,वरिष्ठ उपाध्यक्ष एसकेएफ, सीईओ मर्सिडीज बेंझ, सीईओ जबिल, कॅपजेमिनी, एनरिच एनर्जी, फोर्ब्स मार्शल, जे पी मॉर्गन, एस बँक, भारत फोर्ज, बेलराईज, केपीएमजी, सुहाना मसाले, बजाज अलायन्स यांचे प्रतिनिधी उपास्थीत होते व यांच्याकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
स्किल युनिव्हर्सिटी श्रेणीतील टॉप रँकिंग (२०२५):
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे - प्रथम
सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौर- द्वितीय
यावेळी डॉ. शां. बं. मुजुमदार म्हणाले, "भारतातून पहिला व दुसराही क्रमांक सिंबायोसिस युनिव्हर्सिटीला मिळाल्याने अतिशय आंनंद झाला. भारतातील बेरोजगारी कमी करणे हे एक स्वप्न होते. विद्यापीठ आणि इंडस्ट्री मधील पोकळी स्किल युनिव्हर्सिटीने आम्ही भरून काढत आहोत. कौशल्य आणि शिक्षण यांनी हातात हात घालून चालणे गरजेचे आहे, मिळाले यश हे अतिशय मोलाचे आहे आणि सिंबायोसिसला अशा यशाची सवय आहे, या करीता मदत करणाऱ्याचे आभार".
डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी म्हणाल्या, "एनआयआरएफ हे अतिशय माहिती आधारीत काम करते, हि विद्यापीठाची माहिती व प्रगतीचा आलेख दाखवते, सलग दुसऱ्यांदा सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी प्रथम आली. सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, इंदोरने देखील पहिल्यांदा एनआयआरएफ रँकिंगमध्ये सहभाग नोंदवला आणि दुसरा क्रमांक पटकावला याचा अतिशय आनंद होत आहे. मागील वर्षी एनआयआरएफ रँकिंगमध्ये स्किल युनिव्हर्सिटी विभाग जाहीर केला, त्या वेळी चार युनिव्हर्सिटीनी भाग घेतला होता. त्यामध्ये सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी प्रथम आली. पण या वेळी ३० युनिव्हर्सिटीनी भाग घेतला होता, खाजगी विद्यापीठ असूनसुद्धा सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी प्रथम आली. शासनाने सुद्धा खाजगी विद्यापीठांना खूप चांगले प्रोत्साहन दिले आहे. उच्च शिक्षणा मध्ये प्रगतीसाठी खाजगी विद्यापीठांचा खूप मोठा वाटा आहे. खाजगी आणि स्वयं-वित्त विद्यापीठ असून सुद्धा हे यश मिळवणे हि खरंच आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या मागे आमचे शिक्षक विद्यार्थी, पालक यांचा देखील सहभाग आहे."
"भारतामध्ये कौश्यल्याचे महत्व काय आहे, हे जाणून घेण्याची संधी मला स्किल युनिव्हर्सिटी चालवताना मिळाली. यातूनच पुणे आणि इंदोरच्या स्किल युनिव्हर्सिटीची सुरुवात झाली. हे काम करत असताना, याचा समाजातील भॊगोलिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम व्हावा हाच हेतू आहे. आम्ही भारतातील एकमेव स्किल युनिव्हर्सिटी आहोत जे ३० करोड पेक्षा जास्त सीएसआर प्रकल्प राबवतो ज्यामध्ये आमच्या कॅम्पस, मॉडेल, पायाभूत सुविधाचा वापर, कमी आर्थिक परिस्तिथी असलेला विद्यर्थ्यांसाठी केला जातो, तसेच महिला सक्षमीकरणा देखील प्रयत्न करतो. मागील ५ वर्षात स्टेम कोर्सेस मध्ये ८००० महिलांना प्रशिक्षण दिले आहे. २०% विद्यार्थी शिकत असतानाच स्वतःची कंपनी सुरु करतात".
भविष्यातील योजनांबद्दल बोलताना पुढे त्या म्हणाल्या, " नॅक साठी नोंदणी करण्याच्या विचारात आहोत. एकूण १५ स्किल युनिव्हर्सिटी आहेत, त्यातील ५ महारष्ट्रात आहे, या करीता शासना कडून स्किल युनिव्हर्सिटीच्या नॅक नोंदणीच्या स्वतंत्र नियमांन करीत आम्ही वाट बघत आहोत. आम्ही बायनरी पद्धतीनं पुणे व इंदोरच्या नॅकच्या नोंदणी करीत तयारी करत आहोत. स्किल युनिव्हर्सिटी या वेगळ्या पद्धतीनं काम करत असतात, येणारा परिणाम व इंडस्ट्री कोलॅब्रेशन या दोन गोष्टींवर जास्त भर असतो. म्हणूनच ५०० वर आमचे इंडस्ट्री कोलॅब्रेशन आहेत. भविष्यात विद्यापीठामध्ये संरक्षण तंत्रज्ञान उत्पादन सुरु करण्याचा आमचा मानस आहे".
प्रा. डॉ. विनिथ कुमार नायर, कुलगुरू, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस म्हणाले " या मिळालेल्या यशाचा अतिशय आनंद होत आहे. या यशामध्ये सहभागी सर्वांचे आभार मानतो व धन्यवाद देतो, सिंबायोसिस हे शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहील या करीता नेहमीच प्रयन्त करत राहू."
फोटो ओळ - सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी,व शिक्षकेतर कर्मचारी
Comments
Post a Comment