केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी...



केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी...
केळेवाडी , पौड फाटा, पुणे येथे राहणाऱ्या कु. सानिका भंडारी हिने दिनांक 27 ते 29 जानेवारी दरम्यान बारामती येथे पार पडलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर श्री. दीपकभाऊ मानकर यांनी कु. सानिका हिचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कु. सानिका ही खेळाडू चॅम्पियन कराटे क्लब, वसुधा फाउंडेशन हॉल, केळेवाडी येथे प्रशिक्षण घेते. यासाठी तिला मुख्य प्रशिक्षक शुभम बने आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रसाद वाघमारे, साक्षी तांदळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रभागाचे नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कु. सानिकाला स्पर्धेच्या तयारी पासून ते स्पर्धेत खेळण्यापर्यंत योग्य मार्गदर्शन केले तसेच वेळोवेळी सहकार्य केले, असे प्रशिक्षक शुभम बने यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan