प्रोजेक्ट परवाज दीक्षांत समारंभ उत्साहात, महिलांच्या स्वप्नांना मिळाले नवे पंख
प्रोजेक्ट परवाज दीक्षांत समारंभ उत्साहात, महिलांच्या स्वप्नांना मिळाले नवे पंख
पुणे, दि. २२ मार्च २०२६- इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी (IDTRS) येथे प्रोजेक्ट परवाज अंतर्गत आयोजित दीक्षांत समारंभ उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात १२० दिवसांच्या एलएमव्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पोलीस मोटार परिवहन विभागाच्या मा. गायत्री पवार (SP MT Police dept.), सौ. नितिका गुलहाणे (Specialist - CSR Regional Projects), कु. शैफाली राय (CSR Executive). D.Y Patil कॉलेज च्या प्राध्यपिका डॉ. ज्योती शिंदे (Bioengineering), सौ. सविता पवार मोटार वाहन निरीक्षक RTO पिंपरी चिंचवड आणि सौ. कांचन आवटे प्रोजेक्ट कॉर्डीनेटार (Bloomberg Philanthropies Initiative for Global Road Safety Pune) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमाची उभारणी श्रीमती राणू कुलश्रेष्ठा हेड ऑफ CSR ब्रिजस्टोन इंडिया यांच्या संकल्पनेतुन झाली असून श्री. सैफुल हक (Senior Specialist - CSR), यांनी प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान प्रकल्पाचा आढावा सादर करण्यात आला तसेच प्रशिक्षणाशी संबंधित व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. वाहतूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग हा केवळ रोजगाराचा पर्याय नसून समाजातील सकारात्मक बदलाची नांदी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या समारंभात लाभार्थ्यांनी आपले अनुभव मांडताना आत्मविश्वास, जिद्द आणि स्वावलंबनाकडे वाटचाल यांची प्रेरणादायी कहाणी व्यक्त केली. अनेक महिलांसाठी हा केवळ प्रमाणपत्र मिळण्याचा क्षण नव्हता, तर स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा देणारा टप्पा ठरला.
प्रोजेक्ट परवाज अंतर्गत विविध बेंचमधील प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच 'सारथी' प्रकल्पातील लाभार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. डॉक्युमेंटरी व माजी प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव सादर करून उपस्थितांना प्रेरित करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून महिलांना केवळ रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, तर आत्मविश्वासाने स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकदही मिळत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षण व भविष्यातील व्यावसायिक संधी / नौकरी यांचा आढावा श्री संजय ससाणे, प्राचार्य IDTRS, पुणे यांनी घेतला. तसेच या उपक्रमाला यशस्वी करणारे IDTRS चे सर्व प्रशिक्षक, यशदा माजी संचालक डॉ. सुनील धापाटे. मनशक्ती केंद्राचे श्री. सोपान शिंदे, डॉ निर्मल कुमार राक्षे (राईट वॉक फाऊंडेशन), तसेच CIRT संचालक डॉ. देवेंद्र सिंह, IDTR संस्थेच्या सचिव, नेहा बिसवास व खजिनदार शीतल दुराईस्वामी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याच्या विशेष उल्लेख केला.
"प्रोजेक्ट परवाज" हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, महिलांच्या स्वप्नांना पंख देत त्यांना स्वावलंबनाच्या आकाशात उंच भरारी घेण्यास प्रेरित करणारी एक प्रभावी चळवळ ठरत आहे.
Comments
Post a Comment