पुण्यात रंगला फॅशन आणि आकर्षणाचा भव्य सोहळा — रनवे हाइस्ट सीझन-२

✨ पुण्यात रंगला फॅशन आणि आकर्षणाचा भव्य सोहळा — रनवे हाइस्ट सीझन-२ 🔥
२४ मे २०२६ रोजी हिंजवडी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रनवे हाइस्ट सीझन-२ ने पुण्याच्या फॅशन विश्वात एक वेगळीच छाप निर्माण केली. पूजा सिंह यांच्या संकल्पनेतून दिवा पेजंट्सच्या सहकार्याने आयोजित या भव्य सोहळ्यात देशभरातील ५० हून अधिक मॉडेल्सनी रॅम्पवर आपल्या अदाकारीची मोहिनी घातली.
डोर – ड्रेस ऑन रेंट, बीइंग डिझायनर सिमी, पोश, पुष्पांचल, रॉयल टास्टा तसेच प्रियांका दुबे यांच्या आकर्षक वेशभूषा संग्रहाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमात अनुपमा सिंह, रिधमा काकाणी, लता पांडे, निशा यादव, नीलू मेहता, रेखा पलाडी, आरती बोरोले, मेहर इक्बाल आणि अभिज्ञा खोबरागडे यांनी विशेष आकर्षण ठरत रॅम्पवर मोहक उपस्थिती दर्शवली.
भव्य सादरीकरण, आकर्षक रॅम्पवॉक, सेलिब्रिटी उपस्थिती आणि आलिशान वातावरणामुळे रनवे हाइस्ट सीझन-२ हा पुण्यातील वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला फॅशन सोहळा ठरला.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan