Posts

बीगौस आणि टीआयईएस ग्रुप एकत्र येऊन 500 इलेक्ट्रिक वाहनांसह पुण्यातील लास्ट माईल डिलिव्हरीमध्ये बदल घडवून आणणार

Image
बीगौस आणि टीआयईएस ग्रुप एकत्र येऊन 500 इलेक्ट्रिक वाहनांसह पुण्यातील लास्ट माईल  डिलिव्हरीमध्ये बदल घडवून आणणार पुणे, पुण्यातील इनोव्हेशन आणि समाजाच्या भावनेला अनुसरून वाटचाल करणारे, ज्यांची पुण्यासारख्या आकर्षक शहरात सुरुवात झाली आणि तिथेच पालनपोषण झालेले बीगौस, एक प्रख्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि टीआयईएस  ग्रुप, लास्ट-माईल डिलिव्हरी सोल्यूशन्समध्ये एक अग्रगण्य स्टार्टअप, दोघेही एकत्र आले आहेत. ही धोरणात्मक भागीदारी केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही ) क्षेत्रातील झेप नाही, तर सस्टेनेबल  उपायांचे केंद्र म्हणून पुण्याच्या उदयोन्मुख भूमिकेचा दाखला आहे. दोन स्वदेशी कंपन्या एकत्र आल्यावर, ते एक सामायिक स्वप्न जिवंत करतात - स्वच्छ, हिरवेगार रस्ते आणि ते ज्या शहराला घर म्हणतात त्या शहरासाठी अधिक उज्ज्वल, अधिक टिकाऊ भविष्याची दृष्टी. हे सहकार्य दोन इंडस्ट्री लीडर्सची ताकद,प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या बीगौसच्या पराक्रमाचे मिश्रण, लास्ट माईल डिलिव्हरी सोल्यूशन्समध्ये टीआयईएस ग्रुपच्या प्रगतीसह एकत्र करते. हा  समन्वय इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या संक्रमणाचा वेगवान मा...

*२५ डिसेंबरला 'चुकभूल द्यावी घ्यावी' नाटकाचा २५वा प्रयोग पुण्यात रंगणार*

Image
*२५ डिसेंबरला 'चुकभूल द्यावी घ्यावी' नाटकाचा २५वा प्रयोग पुण्यात रंगणार* *अभिनेत्री अक्षया नाईक, अभिनेता अक्षय मुडावदकर या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र* *२५व्या प्रयोगानिमित्त ख़ास पुणेकरांसाठी विशेष ऑफर* ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा नव्या रुपात रंगभूमीवर आले. अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता अक्षय मुडावदकर ही नवी जोड़ी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २५ डिसेंबरला  या नाटकाचा २५वा प्रयोग टिळक स्मारक रंगमंदिर पुणे येथे संध्या. ५.३० वाजता रंगणार आहे. या २५व्या प्रयोगानिमित्त "तिकीट काउंटरवर" येणाऱ्या पहिल्या २५ रसिक प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.     नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी" नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक प...

*लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा रविवारपासून (१७ डिसेंबर)*

Image
*लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा रविवारपासून (१७ डिसेंबर)* *कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राच्या सामुदायिक पठणाने होणार उत्सवाला प्रारंभ* पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रम दिनांक १७ ते २६ डिसेंबर दरम्यान मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.   पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.   उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.प...

चित्रपटाला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल निर्माते माधुरी भोसले, जिओ स्टुडिओज् आणि कलाकारांनी मानले मायबाप प्रेक्षकांचे आभार..!*

Image
  *चित्रपटाला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल निर्माते माधुरी भोसले, जिओ स्टुडिओज् आणि कलाकारांनी मानले मायबाप प्रेक्षकांचे आभार..!*  केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये 'बाईपण भारी देवा' विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच!   आणि म्हणूनच चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे  १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबई...

*सतारीवर झंकारला सायंकालीन 'मारवा'*

Image
*सतारीवर झंकारला सायंकालीन 'मारवा'* अंकिता जोशी यांचा रंगतदार 'मुलतानी'; सवाईच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र रंगले *पुणे, दि. १४ डिसेंबर २०२३ :* युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेवाती घराण्याच्या गायिका अंकिता जोशी यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने ६९ व्या 'सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा'च्या दुसऱ्या  दिवसाचा पूर्वार्ध गाजवला. त्यानंतर सतारीवर झंकारलेला 'मारवा' ही दाद मिळवणारा ठरला. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात संपन्न होत आहे. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद यांच्यासह प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर आवर्जून उपस्थित होते. अंकिता जोशी यांनी आपल्या गायनाची सुरवात राग 'मुलतानी'ने केली. 'गोकुल गाव का छोरा' या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून 'अजब तेरी बात' या बंदिशीतून तसेच 'आये मोरे साजनवा' या द्रुत रचनेतून त्यांनी रागम...

FOR PUBLICATION IN YOUR ESTEEMED NEWS PAPER AND COVERAGE OF EVENT.

Image
 FOR PUBLICATION IN YOUR ESTEEMED NEWS PAPER AND COVERAGE OF EVENT. In the year 1963, 20 Regimental Schools were converted to the Kendriya Vidyalayas under the aegis of  Kendriya Vidyalaya Sanghthan. The basic purpose of formation of Kendriya Vidyalayas was to cater to the needs of  children of defence personel who are often posted in the remote corners of the country. Our Kendriya Vidyalaya  BEG Pune was one amongst the first 20 Kendriya Vidyalayas established in 1963.  We Cordially Invite you to cover the Diamond Jubilee (60 Years) of Kendriya Vidyalaya BEG, Yerwada, Pune,  th and Kendriya Vidyalaya Sanghthan, New Delhi on Saturday 16 Dec 2023, at 5.00 pm, at Kendriya Vidyalaya BEG,  Yerwada, Pune school premises.  st The Alumni Association was formed on 21 Sept. 1986 at K V BEG, Pune. This Alumni Association is one of the  oldest amongst all the Alumni of Kendriya Vidyalaya Sangathan.  Alumni Association celebr...

पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Image
 पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न पुणे :  पद्मावती फाउंडेशनच्या माध्यमातून विजय बाळासाहेब दगडे यांच्या वतीने  आयोजित रक्तदान शिबिरात २१३ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक स्मार्ट वॉच भेट देण्यात आले. तर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ ६९१ जणांनी घेतला.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ दगडे, माजी आमदार महादेव बाबर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे,मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उद्योजक नंदलाल मौर्य, माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी नगरसेवक प्राची अल्हाट,पद्मावती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय बाळासाहेब दगडे आदि मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरा सोबतच या ठिकाणी नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिरात गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया पद्मावती फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहेत. या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना विजय दगडे म्हणाले,पद्मावत...