*तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त 'धम्मपहाट' व 'धम्मसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन*
*तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त 'धम्मपहाट' व 'धम्मसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन* *-विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांची माहिती* पुणे : तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला 'धम्मपहाट' व संध्याकाळी 'धम्मसंध्या' या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 19 वे वर्षे आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना वाडेकर म्हणाले, येत्या गुरुवार दि.२३ रोजी बुद्ध जयंती निमित्त पहाटे ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे 'धम्मपहाट' हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रतिक जाधव, ...