न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुण्यातील बीएमआय ट्रस्टचा सहभाग

न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुण्यातील बीएमआय ट्रस्टचा सहभाग
पुणे,11 सप्टेंबर 2024 : न्युयॉर्क येथे 22 व 23 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचर 2024 मध्ये पुणे स्थित बीएमआय ट्रस्ट (बॅलेरिना मॅनेजमेंट इन्स्टिट्युट) सहभागी होणार आहे. बीएमआयचे सचिव राजवर्धन जोशी परिषदेत संस्थेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बीएमआय ट्रस्ट हा युनायटेड नेशन्स इकोनॉमिक ॲन्ड सोशल कौन्सिलचा सदस्य असल्याने परिषदेचे निमंत्रण मिळाले. त्यानंतर बीएमआय ट्रस्टच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एका विशेष समितीने निवड केली.

2006 साली स्थापन झालेला बीएमआय ट्रस्ट हा ग्रामीण भागातील महिला,ज्येष्ठ नागरिक व दृष्टीहिनांना सक्षम करण्यावर लक्ष्य केंद्रित करत शिक्षण, ग्रामीण विकास यासह आरोग्य ते पर्यावरण रक्षण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. 2013 पासून युनायटेड नेशन्स इकोनॉमिक ॲन्ड सोशल कौन्सिल (ईसीओएसओसी) मान्यताप्राप्त संस्था असल्याने संयुक्त राष्ट्राच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

समिट ऑफ द फ्युचर 2024 ही एक महत्त्वाची परिषद असून शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याला आकार देण्यावर लक्ष्य केंद्रित करेल.तंत्रज्ञानातील प्रगती,शाश्वत विकास आणि समता यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांबाबत चर्चा करण्यासाठी ही परिषद सर्वांना एकाच व्यासपीठावर आणेल.

बीएमआयचे सचिव राजवर्धन जोशी म्हणाले की,या शिखर परिषदेला उपस्थित राहणे आणि जागतिक नेतृत्व करणारे तज्ञ,इनोव्हेटर्स आणि विचारवंतांशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या परिषदेतून मिळणारे ज्ञान आणि थेट संपर्क बीएमआय ट्रस्टमधील आमच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करेल. नवीनतम जागतिक धोरणे आणि नवकल्पना समजून घेऊन महिला,ज्येष्ठ नागरिक आणि दृष्टीहीन व्यक्तींसाठी तसेच ग्रामीण भागातील आमचे कार्य अधिक सुधारण्यासाठी याची मदत होईल. आमच्या कार्यामध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पध्दती समाविष्ट करून आणखी प्रभावीपणे आमचे काम आम्ही पुढे नेऊ शकू. अर्थपूर्ण बदलांसाठी आवश्यक साधने आणि संपर्क याबाबत ही परिषद उपयुक्त ठरेल. या परिषदेत बीएमआयचे कार्य,ग्रामीण विकास,महिला सबलीकरण आणि गरजूंना मदतीच्या आमच्या कार्याबाबतची आमची अंर्तदृष्टी आम्ही उपस्थितांसमोर मांडू.

याआधी बीएमआय ट्रस्टला संयुक्त राष्ट्रांच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मंचामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालय,न्युयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी परिषद (2016), युएन वुमन एम्पॉवरमेंट/डीईएसए,न्युयॉर्क(2017),इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वुमन,जिनिव्हा (2018),महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता,न्युयॉर्क (2023), वर्ल्ड पीस फोरम (जागतिक शांतता मंच),दक्षिण कोरिया (2024) इत्यादींचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*