सावित्रीबाई चंद्रकांत दांगट पाटील यांचे निधन

सावित्रीबाई चंद्रकांत दांगट पाटील यांचे निधन 

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकचे पहिले सरपंच आणि पंचायत समिती सदस्य चंद्रकांत उर्फ चंदर दांगट पाटील यांच्या पत्नी आणि नगरसेविका नीता दांगट पाटील यांच्या सासुबाई सावित्रीबाई चंद्रकांत दांगट  पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे हेमंत दांगट पाटील, अनंत दांगट पाटील ही दोन मुले, सुना नातवंडे आणि पाच विवाहित मुली असा परिवार आहे. 

चंद्रकांत दांगट पाटील हे वडगावचे मूळ रहिवासी असून ते गावाचे मुलकी पाटील होते. त्याचप्रमाणे वडगावचे पहिले सरपंचही होते. त्याच प्रमाणे पंचायत समिती सदस्यदेखील होते. गावाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. सावित्रीबाई यांनी त्यांना मोलाची साथ दिली. 

चंद्रकांत दांगट पाटील यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना सांभाळले व त्यांच्यावर योग्य संस्कार केले. वडगाव आणि परिसरात समाजकार्यामध्ये सावित्रीबाई  यांचा नेहमी पुढाकार राहिला. त्यांच्या निधनाने वडगाव परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*