खडकी भागात ६ कोटींची विकासकामे पूर्ण तर ५ कोटींच्या कामांना मंजुरी

 खडकी भागात ६ कोटींची विकासकामे पूर्ण तर ५ कोटींच्या कामांना मंजुरी 

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांतून पूर्ण ; लवकरच पुढील कामांना होणार प्रारंभ 



पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी भागात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून मागील काही महिन्यांत तब्बल ६ कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून ५ कोटींच्या विकासकामांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळालेली विकासकामे पुढील काही महिन्यांमध्ये मार्गी लागतील, अशी माहिती सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.    


खडकी हा भाग शिवाजीनगर मतदार संघातील एक महत्त्वाचा भाग असून या भागात मागील काही महिन्यांत दर्जी गल्ली विठ्ठल मंदिरासमोर, साईबाबा मंदिराजवळ गवळी वाडा, राजीव गांधी नगर, लक्का वाडा, महादेववाडी, अरुण कुमार वसाहत, दर्गा वसाहत, धोबी गल्ली, खडकी डेपो लाईन मित्र मंडळ परिसर,  हुले बिल्डींग ते इंदिरानगर पर्यंत या भागांमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  


याबरोबरच खडकी छावणी परिषद हद्दीतील वाडे, मोहल्ले, सोसायटी, झोपडपट्टी, चाळी परिसरातील गल्ली बोळ येथे सिमेंट- कॉंक्रीटीकरण करणे व इंटरलॉकिंग ब्लॉक टाकणे, खडकी साप्रस येथील जय शिवशंकर गृहसंस्था, शुभम पार्क सोसायटीकडे जाणारा रस्ता, तसेच गंधम नगर फेज - २, राधाकृष्ण सोसायटी, क्षितीज सहकारी गृहसंस्था या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, खडकी छावणी परिषद हद्दीत मैदान, व्यायाम शाळा, ओपन जिम उभारत त्यांमध्ये व्यायामाचे साहित्य पुरविणे, इंदिरा गांधी नगर येथे कॉंक्रीटीकरण करणे, वार्ड क्र. १ मधील संत शिरोमणी सावता माळी महाराज, अखिल खडकी मातंग सेवा संस्था व राजीव गांधी नगर, गंधकुटी बुद्धविहार जवळ सामाजिक सभागृह बांधणे, एकमुखी दत्त मंदिर, गाडी अड्डा या ठिकाणी अभ्यासिका उभारणी ही महत्त्वाची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.


खडकी बंगला नं १५, ३० परिसरात नवीन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, खडकी शिक्षण संस्थेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ऑर्डनन्स फॅक्टरी एमप्लोईज एज्युकेशन सोसायटी रेंजहिल्स सेकंडरी स्कूल खडकी येथे शौचालय बांधणे व पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणे, गवळीवाडा येथील साईबाबा मंदिराजवळ कॉंक्रीटीकरण करणे, खडकी धोबीगल्ली येथील मरीमाता मंदिर व संगम मित्र मंडळ परिसरात कॉंक्रीटीकरण करणे, खडकी रेल्वे स्टेशन रोड येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी विकासकामे देखील शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून पूर्ण करण्यात आली आहेत.


याशिवाय खडकी भागातील आझाद मित्र मंडळ, महादेव युवा प्रतिष्ठान, लुंबिनी कुंज बुद्ध विहार, डेपो लाईन मित्र मंडळ, कार्तिक मित्र मंडळ, नवनिकेतन तरूण मंडळ, सर्व्हे नं. ५७४ बी या भागांतही विविध विकासकामे पूर्ण झाली असून याची एकत्रित किंमत ही ६ कोटी रुपंये इतकी आहे. याशिवाय खडकी भागातील इतर अनेक विकासकामांसाठी ५ कोटींच्या निधीची प्राथमिक मंजुरी मिळालेली असून येत्या काही महिन्यांत ही देखील विकासकामे पूर्ण होतील असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*