मेघालय सरकारद्वारे देशातील पहिल्या संपूर्ण डिजिटल लॉटरीचे अनावरण

 मेघालय सरकारद्वारे देशातील पहिल्या संपूर्ण डिजिटल लॉटरीचे अनावरण 



पुणे   : मेघालय शासनाद्वारे आज EasyLottery.In, ची घोषणा करण्यात आली, ही भारतातील पहिली संपूर्णपणे डिजिटल अशी लॉटरी असून याचा उद्घाटन समारंभाला, मेघालयचे माननीय मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा; ईआरटीएस, मेघालय राज्याचे, आयुक्त प्रविण बक्षी (आयएएस); मेघालय राज्य लॉटरीचा अध्यक्षा एम.एस.एन. मारक आणि इतर प्रसिद्ध व्यक्ति उपस्थित होते. याच वेळेला https://easylottery.in/ हे संकेतस्थळ देखील लाईव सुरू झाले. “बिग ५० ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस हे  भारतीय चलनात रू. 50,00,00,000/-, (पन्नास कोटी) असणार आहे. EasyLottery.in ही पारदर्शक लॉटरीचा अनुभव देणारी एक गेम चेंजर लॉटरी ठरण्याचे आश्वासन देते; मग त्यात तिकिटांचा खरेदी पासून पैशाचा वाटपापर्यंत सगळ्यामध्येच ही पारदर्शकता बघायला मिळणार आहे. 


कॉन्रॅड संगमा यांनी लॉटरी क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि व्यवसायिकता  ही संपूर्णपणे डिजिटल माध्यमाने आणण्याचा या प्रयत्नांचे कौतुक केले. संगमा यांनी असे देखील नमूद केले की लॉटरी ही शेवटी नशीबावर अवलंबून असते आणि EasyLottery.in सारख्या पारदर्शक आणि डिजिटल माध्यमाने प्रत्येकाला आणि समाजाला त्याचा लाभ घेता येणार आहे. बऱ्याच भारतीयांचा वेळ हा ऑनलाईन खेळ खेळण्यात तसेच बेकायदेशीर बेटिंग ॲप्सवरती पैसे लावण्यात जातो आहे शिवाय या सगळ्याचे व्यसन देखील लागते आहे. पण  EasyLottery.in ची रचना ही अशा पद्धतीने केली आहे की लोकांना हे खेळल्याने मज्जा तर लुटता येईल पण त्याचा समाजाला देखील फ़ायदा होईल.  आपण बक्षीस जिंकलात तर, आपल्याला त्याचा फ़ायदा होईल, पण आपण हरलात तर त्यावर भरल्या जाणाऱ्या करामुळे समाजाचा आणि देशाचा फ़ायदाच होणार आहे.  


या उद्घाटन सोहळ्याचा दिवशी बोलताना, एम.एस.एन. मारक म्हणाल्या, “ आमचा एवढी लोकसंख्या असलेल्या आणि डिजिटल माध्यमांनी सबळ झालेल्या भारता सारखा देशात लॉटरी क्षेत्र मात्र डिजिटलायझेशनचा बाबतीत मागे पडले होते. EasyLottery.in च्या येण्याने,आम्ही ती कमतरता भरून काढतो आहोत. आमची तिकिट विक्री, बक्षीसांचे वाटप आणि कर देय हे सगळं डिजिटल माध्यमानी केलं जाणार आहे. आमचा या विक्रीपासून, बक्षीसांचा वाटपापर्यंतचा प्रवासात एकच गोष्ट डिजिटल माध्यमाने केली जाणार नाही ती म्हणजे लॉटरी काढणे. आणि असे आम्ही याकरिता करतो आहोत की आम्हाला विश्वसनीय आणि पारदर्शक पद्धतींचा अवलंब करायचा आहे, कारण मोटरने चालणाऱ्या पद्धतीने निकालांची हेराफ़ेरी करता येऊ शकते.आम्हाला खरचं लॉटरी लागणे नशीबावरच अवलंबून असते हे सिद्ध करायचे आहे.”


“EasyLottery.inच्या माध्यमाने,आम्ही तीन महत्वाचा बाबींवरती लक्षत केंद्रित करणार आहोत…. विश्वास, पारदर्शकता आणि कायदेशीरता. आम्ही देशातील लोकांसमोर संशोधन आणि सखोल अभ्यासकरूनच ही लॉटरी घेऊन आलो आहोत. या कल्पक अशा व्यासपिठावरून भारतात खेळल्या जाणाऱ्या लॉटरी पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणली जाणार आहे आणि पैशांचा गफ़ला किंवा मनी लॉन्डरिंग सारख्या गोष्टी होऊ नये याची देखील हमी मिळणार आहे. EasyLottery.in मुळे समाज आणि इथल्या लोकांना अधिक महत्वं दिले जाणार असून त्यातून मिळणारा आनंद आणि शासनाचा लाभांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” असे देखील श्री, प्रविण बक्षी म्हणाले. 


EasyLottery.in: आगळे वेगळे घटक

EasyLottery.in ही आपल्या जबाबदारीने खेळल्या जाणाऱ्या तत्वावर आधारलेली एक स्थिर अशी लॉटरी असणार आहे. प्रणालीचे प्रोग्रामिंग हे अशा पद्धतीने केले गेले आहे की सातत्याने तिकिट खरेदी करणाऱ्या पण हरणाऱ्या व्यक्तीला ओळखता येऊ शकेल; आणि मग काहीकाळ त्याचे खाते बंद देखील करून ठेवले जाईल. यामुळे ग्राहक सुरक्षित आणि सिमीत क्षमतेनु्सार आपले नशीब आजमावत असल्याची खात्री मिळू शकेल. जिंकणाऱ्या व्यक्तींची खाती मात्र, तात्पुर्ती देखील बंद केली जाणार नाही. 

असे करण्याचा मुख्य हेतू हा जिंकणाऱ्यांना बक्षीसांमुळे लाभ व्हावा असाच आहे, पण या सगळ्याचे व्यसन लागू नये किंवा ते परावलंबी बनू नये याची देखील काळजी घेतली जाणार आहे, आम्ही मध्ये येऊन त्यांना मदत करणार आहोत. मनी लॉन्डरिंग होणारी नाह याची काळजी घेण्याकरता , EasyLottery.in जिंकणाऱ्या तिकिटाचे पैसे ग्राहकाकडेच जातील याची खात्री करून घेणार असून त्याकरिता नाव नसलेल्या व्यक्तींना “हस्तांतरण न करण्याचे धोरण” आमचा कडून वापरले जाणार आहे. 


तिकिट, किंमत आणि बक्षीसे

देशातील नागरिकांवर लक्ष केंद्रित करताना आम्ही सगळ्याच स्टेक होल्डर्सचा जिंकण्याची काळजी घेणार आहोत, EasyLottery.in  मधली रक्कम ही अगदीच थोडी असणार आहे. तिकिट खरेदीचा तंत्रामध्ये सुद्धा तीन निवडीचे पर्याय असतील, ज्यातून खेळाडूंना सर्वोत्तम वाटणार पर्याय  खालील पद्धतीने निवडता येतील:


* पर्याय 1: यादृच्छित निवड, जिथे तिकिटाचा क्रमांक हा प्रणाली द्वारे निवडला जाईल. 

* पर्याय 2: एकूण निवडींची संख्या, जिथे एक ते नऊ आकड्यांपैकी एका आकड्याची निवड करता येऊ शकेल; व तिकिटाचा क्रमांची बेरीज ही त्या निवडलेल्या संख्येनुसार असेल

* पर्याय 3: निवड पूर्ण करा, जिथे खरेदी करणाऱ्याला, अतिरिक्त तिकिटांची संख्या त्यांच्या आवडीनुसार निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. 


EasyLottery.in मध्ये सर्वाधिक जिंकायची बक्षीसे असणार आहेत ज्यात पहिले बक्षीस हे भारतीय चलनात रू. 50,00,00,000/- असेल जे भारतीय लॉटरी क्षेत्राचा इतिहासातील सर्वात मोठे बक्षीस असणार आहे. प्रत्येक तिकिटाची किंमत रू. 5,000/- असेल जी आंतरराष्ट्रीय लॉटरीज पेक्षा … किती तरी पटीने कमी आहे.

EasyLottery.in मध्ये पहिले बक्षीस प्रत्येक ड्रॉचा वेळी निघाणार असून जिंकाऱ्या व्यक्तीचे नाव हे एक-अक्षर आणि चार- संख्यांचा ड्रॉ पद्धतीने फ़क्त 2,60,000 तिकिटांचा ड्रॉ मधून सांगितले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या www.easylottery.in किंवा संपर्क साधा

Comments

Popular posts from this blog

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

*ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी परिवहन आयुक्त कार्यालय ,मुंबई येथे बैठक*संपन्न*